गुगलचं होळीसाठी स्पेशल डुडल

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

परदेशात देखील भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे राहिलं असतं तरच नवल म्हणायचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून होळीच्या शुभेच्छा दिल्यात. गुगलवर लहानग्यांची टोळी रंगांची उधळण करत असल्याचं या डुडलमधून पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे गुगलकडून या डुडलचा एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहे. त्यात सर्वांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. व्हिडीओत लिहिलं आहे की, आम्ही होळीच्या शुभेच्छा देतोय, हिंदूंचा होळीचा सण भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या उत्साहास साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला 2017 या वर्षांत प्रेम आणि शांती नांदत राहण्याच्या शुभेच्छा देतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google celebrates festival with adorable Doodle!

टॅग्स