Google Chromeचा नवा लोगो पाहिला का? 8 वर्षांनी झाला बदल

Google Chrome is changing Logo after 8 years
Google Chrome is changing Logo after 8 years

सर्वात जास्त वापरले जाणारे ब्राऊझर गुगल क्रोमच्या ( Google Chrome) लोगोमध्ये (Logo) बदल करण्यात येणार आहे. जवळपास ८ वर्षांनी गुगल क्रोमचा हा लोगो बदलण्यात येणार असून २०१४ पासून तो बदलला नव्हता. नव्या लोगोबाबत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत असून गुगल क्रोमच्या नव्या लोगोची डिझाईन नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली नसून याबाबत युजर्सने ट्विटरवर मीम शेअर करण्यास सुरूवात केली आहे.

Google Chromeच्या लोगोमध्ये खूप कमी बदल करण्यात आहे. त्यामुळे तो जुन्या लोगोप्रमाणे दिसत आहे, ज्यामुळे नव्या लोगोची खिल्ली उडवली जात आहे. (Google Chrome is changing Logo after 8 years)

Google Chrome is changing Logo after 8 years
Boycott Hyundai नंतर KFC, Pizza Hut वर भारतीयांचा रोष; बहिष्काराच्या पोस्ट ट्रेंडमध्ये

गुगुल क्रोमच्या नव्या लोगोबाबत काही मीम्स टिव्टरवर व्हायरल होत आहे. swatic12 या ट्विटर हॅन्डलवरून मीम शेअर केले असून त्यामध्ये दोन्ही लोगो दाखवून त्याला कॅप्शन दिले आहे की, ''असे वाटते काही केले नाही पण काहीतरी केले आहे''

cricketpun_duh या ट्विटर हॅन्डलवरून नवीन लोगोची तुला जपानच्या फ्लॅग रिडिझाईनसोबत केली आहे

यूजर _gayatrii या ट्विटर हॅन्डलवरून दोन्ही लोगोची तुलना करताना अनिल कपूरचे फोटो शेअर केला आहे

Google Chrome is changing Logo after 8 years
Hyundai अन् कश्मीर वाद काय? एका चुकीमुळं उठला कंपनीचा बाजार

नवीन लोगोवर ट्विटर हँडलर GoggleWalaMemer ने एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये लिहले आहे की, ''दोन्ही वेगळे होते का?''

यूजने नव्या लोगो डिझाईन करणाऱ्या डिझानरसंबधीत मीम शेअर केली आहे. ट्विटर हॅन्डल akshaymarch7 ने ही मीम शेअर केल्या आहेत.

नवीन गूगल क्रोम डिझाईनबाबत टि्व्टवर हँडल zhr_jafri ने लिहले आहे, ''थोडा देखील प्रयत्न केला नाही तू''

गुगल क्रोममधील बदल सध्या सर्व युजर्सला दिसत नाही. आता गुगल क्रोम डेव्हलपर व्हर्जन Chrome Canary मध्ये पाहता येतो. पण पुढील काही महिन्यांमध्ये सर्वांना हा लोगो दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com