मस्तच! गुगल क्रोमवर आले हटके फीचर्स, वस्तू स्वस्त होताच मिळणार अलर्ट; पैशांची होईल बचत | Google Chrome | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chrome

Google Chrome: मस्तच! गुगल क्रोमवर आले हटके फीचर्स, वस्तू स्वस्त होताच मिळणार अलर्ट; पैशांची होईल बचत

Google Chrome New Features: दिग्गज टेक गुगलने यूजर्ससाठी एक खास फीचर जारी केले आहे. यूजर्सला आता एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास त्वरित त्याची माहिती मिळणार आहे. हे फीचर गुगल क्रोम ब्राउजरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे यूजरला प्रोडक्टची किंमत पाहण्यासाठी वारंवार पेजला रिफ्रेश करावे लागणार नाही. एका क्लिकवर वस्तूची संपूर्ण माहिती मिळेल. मात्र, ही सुविधा सध्या केवळ अमेरिकन यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच इतर देशातील यूजर्ससाठी देखील हे फीचर्स जारी केले जाणार आहे.

कंपनीने माहिती दिली की, यूजर्सला वस्तूची किंमत कमी झालीये हे जाणून घेण्यासाठी गुगल क्रोममध्ये ईमेल अथवा मोबाइलवर प्राइस ड्रॉप अलर्ट पर्याय निवडावा लागेल. क्रोम अ‍ॅड्रेस बारध्ये ट्रॅक प्राइस पर्याय निवडल्यावर तुम्हाला वस्तूची किंमत कमी झाल्याची माहिती मिळेल.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

शॉपिंग कार्टची मिळेल सुविधा

तसेच, यूजर शॉपिंग कार्ट पाहण्यासाठी नवीन टॅब उघडू शकतात व वस्तूंवरील ऑफरची माहिती मिळेल. ही नवीन सुविधा सध्या गुगल क्रोमच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. गुगल क्रोम डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करताना कोणत्याही फोटोवर राइट क्लिक करून गुगल लेंसच्या मदतीने इमेज सर्चचा पर्याय निवडू शकता.

हेही वाचा: Smart TV Offer: भन्नाट ऑफर! ५५ इंच स्मार्ट टीव्ही चक्क अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

पैशांची होईल बचत

गुगल क्रोमच्या माध्यमातून यूजर्सला बेस्टसेलर वस्तूंच्या किंमतीत झालेल्या कपातीविषयी माहिती मिळेल. यामुळे वस्तू स्वस्त झाल्यावरच खरेदी करता येईल व पैशांची देखील बचत होईल. क्रोम ब्राउजरवरच पेमेंट डिटेल्स सेव्ह करण्याची सुविधा मिळते, यामुळे वेळ देखील वाचेल.

हेही वाचा: Lensa AI: दीपिका, सईचा हा अ‍ॅनिमे लूक आला तरी कुठून? पाहा डिटेल्स

टॅग्स :Googlegoogle chrome