
यूट्यूबच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. गुगलने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर प्रत्येकजण लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकणार नाही. मुलांना चांगली सुरक्षा देण्यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी किमान वय १३ वर्षे होते. जे आता १६ वर्षे करण्यात आले आहे आणि पुढील महिन्याच्या २२ जुलैपासून हा नवीन नियम लागू होईल.