'www' ची पूर्ण झाली 30 वर्ष

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 मार्च 2019

नवी दिल्ली - कोणतंही संकेस्थळ म्हटलं की त्याची सुरुवात होते www ने. www अर्थात world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे.  

कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असते. ज्यात एकत्र जोडून वेबसाइट बनवली जाते. याचा शोध वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना लावला. गुगलने डुडल बनवताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाचीही आठवण केली. 

जगाला इंटरनेटची भेट देणारे टीम बर्नर ली यांचा इंग्लंडमध्ये जन्म झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 मध्ये फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये सर्वात आधी इंटरनेट आणि world wide web तयार केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Doodle Celebrates World Wide Web's 30th Birthday