'फिअरलेस नाडीया' यांना डूडलद्वारे श्रद्धांजली

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

भारतातील पहिल्या महिला 'स्टंटवुमन' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या 'फिअरलेस नाडीया' यांना गुगलने डूडलद्वारे आज त्यांच्या जन्मदिनी श्रद्धांजली वाहिली.

मेरी इवांस वाडिया असे त्यांचे नाव होते. परंतु, सिने जगतात 'फिअरलेस नाडीया' किंवा हंटरवाली' अशी त्यांची ओळख होती. चालत्या ट्रेन मधून उडी मारायची असो, वाघांबरोबर खेळणे असो किंवा घोडेस्वारी सगळे स्टंट त्या स्वत: करत. 

नाडीया मुळच्या ऑस्ट्रेलियाच्या होत्या. वयाच्या पाचव्या वर्षी त्या भारतात आल्या. लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या. या दरम्यान त्यांनी आपले नाव नाडीया असे ठेवले. 

1935मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या हंटरवाली या चित्रपटाच्या यशानंतर त्या हंटरवाली याच नावाने प्रसिद्ध झाल्या. त्याकाळातील महिलेची प्रमुख भूमिका असलेला हा पहिला चित्रपट होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Doodle pays tribute to Fearless Nadia on her 110th birth anniversary