esakal | डॉ. हरगोविंद खुराना यांना डूडलद्वारे श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

dr.khurana

डॉ. हरगोविंद खुराना यांना डूडलद्वारे श्रद्धांजली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांच्या जन्मदिनी आज गुगलने डूडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना रॉबर्ट डब्ल्यू हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबत 1968चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

9 जानेवारी 1922रोजी पाकिस्तानात असणाऱ्या ‘रायपूर’ गावी त्यांचा जन्म झाला. 1945मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून ते एमएस्सी झाले. 1948मध्ये लिव्हरपूल (इंग्लंड) येथे संशोधन कार्य करून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. तेथेच अनेक विद्यापीठांतून जीवशास्त्र व रसायनशास्त्राचे अध्यापन केले. 1966मध्ये त्यांनी अमेरिकचे नागरिकत्व स्वीकारले. जीवनशास्त्रात केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे आनुवंशिकतेतील रहस्यावर प्रकाश पडला.

loading image