Google For India : भारतासाठी गुगलच्या अनेक घोषणा; युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google

भारतासाठी गुगलच्या अनेक घोषणा; युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Google for India 2021 : जगातील प्रसिद्ध टेक कंपनी Google ने भारतीय वापरकर्त्यांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. या बदलानंतर, वापरकर्त्यांना Google वेबवर त्यांच्या स्थानिक भाषेत सर्व माहिती मिळणार आहे. यामुळे, अधिकाधिक वापरकर्त्यांना कमी वेळेत अचूक आणि उपयुक्त माहिती मिळू शकेल. कंपनीचे दावा आहे की गुगल प्लॅटफॉर्मवरील बहुतांश माहिती इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, त्यामुळेच बहुतांश वापरकर्ते प्लॅटफॉर्म वापरू शकत नाहीत. पण आता स्थानिक भाषेच्या सपोर्टमुळे यूजर्सना कमी वेळेत योग्य माहिती मिळणार आहे.

Google च्या अधिकृत ब्लॉगवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय भाषांचे भाषांतर करण्यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने, कंपनीने आज एक विशेष फीचर जाहीर केले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत माहिती पुरवणार आहेत देईल. तसेच कंपनीने कोरोना वॅक्सिनेशन साठी स्लॉट बुक करणे या सोबतच गूगल सर्च, जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि अन्य गूगल अॅप्सच्या अपडेटचीही माहिती दिली आहे.

Google Search चे नवीन फीचर्स

Google Search चे नवीन फीचर्स वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत हायक्वलिटी वेब कंटेंट उपलब्ध करून देईल. तसेच वापरकर्ते ही माहिती मुळ सोर्समध्ये ज्या भाषेत आहे त्या भाषेत देखील वाचू शकतात. तुमच्या माहितीसाठी, Google च्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांसाठी हिंग्लिश (हिंदी इंग्लिश) सह पाच भारतीय भाषा उपलब्ध आहेत. यामध्ये हिंदी, बंगाली, मराठी, तेलुगू आणि तामिळ यांचा समावेश आहे. इतर भारतीय भाषा लवकरच या प्लॅटफॉर्मवर जोडल्या जातील. गुगलच्या दाव्यानुसार, कंपनीने आपल्या वापरकर्त्यांचा व्हॉइस एक्सपिरियंस सुधारण्यासाठी एक विशेष फीचर दिले आहे. हे वापरुन गुगल वापरकर्ते वेब पेजवरील सर्च रिझल्ट ऐकू शकणार आहेत. त्यामुळे तुमचे वाचण्याचे कष्ट देखील करावे लागणार नाहीत

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

गुगल असिस्टंट

गुगल एंड-टू-एंड लसीकरण बुकिंग सपोर्ट देणार असून आहे, गुगल असिस्टंटद्वारे यासाठी मार्गदर्शन केले जाईल. करोना लसीकरणसाठी गुगल असिस्टंटचा वापर करता येणार आहे. हे वपरुन तुम्ही स्लॉट्सची उपलब्धता पाहू शकाल. गुगल असिस्टंट तुमच्यासाठी लस स्लॉट बुक करु शकेल.

हवामानाबदद्ल माहिती..

तसेच Google भारतातील हवामानाच्या घटनांशी संबंधित माहिती दाखवेल आणि त्यासाठी भारतीय हवामान विभाग (IMD) आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांच्याशी भागीदारी करत आहे. Google सर्च रिअल-टाइम एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) दाखवेल आणि त्यासोबतच वापरकर्ते त्यांच्या जवळच्या स्टेशनवरून हवेची गुणवत्ता गुगलवर पाहू शकतील. Google अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या अत्यंत हवामानविषयक सूचना देखील देईल त्यासाठी आयएमडीसोबत भागीदारी केली जाणार आहे. अतिवृष्टी, उष्णतेची लाट, थंड लाट किंवा गडगडाटी वादळासाठी हवामान विषयक सूचना देण्यात येतील

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

loading image
go to top