
AI Saree Trend Raises Questions About Identity and Privacy in Digital Fashion
esakal
सोशल मीडियावर सध्या एक नवीन लाट उसळली आहे एआय साडी ट्रेंड! इन्स्टाग्राम आणि X वर तुम्ही स्वत:चे रेशमी साडीत, रेट्रो बॉलिवूडच्या झगमगाटात सजलेले फोटो शेअर केले आहेत का? ‘एआय नॅनो बनाना’ साडी एडिट्समुळे हे शक्य झाले आहे. सेल्फी अपलोड करा आणि काही क्षणांत स्वत:ला चमकत्या साडीत, परिपूर्ण सौंदर्यासह पाहा. पण हा फक्त ट्रेंड आहे की यामागे काही खोलवरचे प्रश्न दडले आहेत? जसे की तुम्ही फोटो तर बनवले, पण त्या एआय सिस्टममध्ये स्टोअर झालेल्या फोटोचे पुढे काय होते? यामुळे डेटा लिक होतो का?