

Google Gemini Nano Banana Kids Images
sakal
Children’s Day AI Prompts : दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिवस साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप प्रिय होती. तसेच लहान मुलांना देखील ते आवडायचे त्यामुळे लहान मुलं नेहरूंना चाचा नेहरू असेही म्हणायचे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच आज बालदिवस साजरा केला जातो.
शाळा, कॉलेजेस, ऑफिसमध्ये आणि प्रत्येक घराघरातही हा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळेत लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. स्पर्धा घेतल्या जातात. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी हा दिवस खास करायचा असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता.