भारतात नोकरीसाठी 'गुगल इंडिया' सर्वोत्तम

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

नवी दिल्ली - भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत गुगल इंडियाला पहिला मान मिळाला आहे. 

कर्मचाऱ्यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ आर्थिक सेवा क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस इंडिया आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात अमेरिकन एक्सप्रेस इंडिया चौथ्या तर उज्जीवन फायनान्स तब्बल चोवीसाव्या क्रमांकावर होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने ‘ग्रेट प्लेस टू वर्क‘ संस्थेकडून देशातील कॉर्पोरेट कार्यालयाविषयी केल्या जाणाऱ्या वार्षिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यंदा सुमारे 800 कंपन्या व 1.55 लाख कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. मॅरियट हॉटेल्स, ओबेरॉय समुह व लेमन ट्रीसारख्या प्रमुख आदरातिथ्य क्षेत्रातील कंपन्यांना पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याशिवाय, टेलिपरफॉर्मन्स इंडिया, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, सॅप लॅब्स इंडिया आणि इनट्युट प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटरसारख्या भिन्न क्षेत्रातील कंपन्या नोकरीसाठी सर्वोत्तम ठरल्या आहेत. 

संस्थेतील विश्वास, अभिमान आणि कर्मचाऱ्यांचे आपापसातील मैत्रीभाव मोजण्यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी केंद्रीत धोरणाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याशिवाय, तेथील कर्मचाऱ्यांचे आचरण, तत्त्वज्ञान आणि संस्थेची मूल्ये अभ्यासण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली. त्यावरुन, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कंपनीचे क्षेत्र, आकार इत्यादी बाबींचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google India is most desired employer in India