Google for India 2022 : गुगलने भारतीय वापरकर्त्यांसाठी आणले खास फीचर्स, पेमेंट अ‍ॅप देखील बदलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google introduced special features for indian customers google pay app in google for india 2022 events

Google for India 2022 : गुगलने भारतीय वापरकर्त्यांसाठी आणले खास फीचर्स, पेमेंट अ‍ॅप देखील बदलले

Google for India 2022 : गुगलने भारतातील गुगल फॉर इंडिया २०२२ या सर्वात मोठ्या कार्यक्रमात अनेक नवीन फीचर् आणि उत्पादनांची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स आणि बदल देखील जारी केले आहेत.

कंपनीने त्याच्या DigiLocker आणि Google Pay मध्ये नवीन ट्रांजेक्शन सर्च फीचर देखील दिलं आहे. भारतासाठी Google ची ८ वी आवृत्ती सोमवार १९ डिसेंबर रोजी प्रगती मैदान, दिल्ली येथे झाली. या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये Google च्या प्रमुख घोषणा आणि फीचर्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Google Pay मध्ये नवीन ट्रांजेक्शन सर्च फीचर

Google ने त्याच्या इव्हेंटमध्ये डिजिटल पेमेंट अ‍ॅप Google-Pay साठी नवीन सेक्युरिटी फीचर ट्रांजेक्शन सर्च लॉंच केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या व्यवहारांबद्दल जाणून घेण्यास मदत होणार आहे. यासोबतच वापरकर्ते त्यांच्या आवाजाद्वारे ट्रांजेक्शन पाहू शकतील. कंपनीचे म्हणणे आहे की आता Google Pay वर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे आणि वापरकर्त्यांना प्रादेशिक भाषेतही अलर्ट मिळू शकतील.

हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

प्रोजेक्ट वाणी

Google कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने AI/ML मॉडेल तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सशीही भागीदारी केली आहे. या प्रकल्पाला 'प्रोजेक्ट वाणी' असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत विविध भारतीय प्रादेशिक भाषांचे संकलन आणि ट्रांसक्राइब केले जाईल. यासाठी, कंपनी भारतातील 773 जिल्ह्यांमधून भाषेचे ओपन सोर्स सॅम्पल संग्रहित करेल.

हेही वाचा: Lionel Messi : मेस्सीचा जन्म आसाममध्ये, कॉंग्रेस खासदारानं तोडले अकलेचे तारे

डिजीलॉकर आणि फाइल्स होणार लिंक

Google ने डिजिटल डॉक्युमेंट्स अ‍ॅप डिजिलॉकरमधील फीचर्स वाढवत याला गूगल शेअरिंग अ‍ॅप फाइल्ससोबत इंटिग्रेट करण्यात आले आहे.

म्हणजेच यूजर्स फाइल्स अ‍ॅप्सच्या मदतीने डिजिलॉकर अ‍ॅप मधील व्हेरिफाइड डिजिटल डॉक्युमेंट एक्सेस करू शकतील. डिजिटल डॉक्युमेंट्स अ‍ॅप आहे, जे रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर देखील मान्य केलं जातं.

गुगल रिमोट सेन्सिंग

या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. पिचाई म्हणाले की, गुगल भारतातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी रिमोट सेन्सिंग क्षमता वापरत आहे. यासाठी कंपनीने एक मॉडेल तयार केले आहे. सध्या तेलंगणामध्ये त्याची चाचणी सुरू आहे. या एआय-आधारित मॉडेलच्या मदतीने, पूर यांसारख्या आपत्तींचा अंदाज लावण्यात आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल. या मॉडेल्सच्या मदतीने पिकांमध्ये होणारे बदल आणि सद्यस्थितीही जाणून घेता येते.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : देशात बिकीनीवरून ट्रोल होणाऱ्या दीपिकाने कतारमध्ये केले वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

यूट्यूब कोर्सेस

Google YouTube क्रिएटर्सच्या सहकार्याने YouTube कोर्सेस सुरू करणार आहे. हे पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केले जाऊ शकते. YouTube कोर्सेसच्या मदतीने, कंटेंट क्रिएटर्स कोर्स मॉनिटाइज करू शकाल.

टॅग्स :Google