Google Photos : आता गुगल स्वतःच एडिट करून देणार तुमचे फोटो! नवीन फीचर झालं लाँच

गुगलच्या या फीचरमुळे एका क्लिकमध्ये तुमचा फोटो एडिट होणार आहे.
Google Photos
Google PhotoseSakal

बऱ्याच जणांना आपले फोटो पोस्ट करण्यापूर्वी ते एडिट करण्याची आवड असते. कित्येक वेळा लोक फोटो एडिट करता येत नाही, म्हणून ते पोस्टही करत नाहीत. तुम्हालाही फोटो एडिटिंग येत नसेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

गुगलने आता आपल्या यूजर्ससाठी नवीन फोटो एडिटिंग फीचर्स लाँच केले आहेत. या माध्यमातून गुगल स्वतःच तुम्हाला फोटो एडिट करून देणार आहे. त्यामुळे केवळ एका क्लिकमध्ये तुमचा फोटो आपोआप एडिट होईल.

Google Photos
Google Family Link : मुलांना स्मार्टफोन द्यायला भीती वाटतेय? आता चिंता सोडा! गुगलचं हे फीचर ठरेल फायद्याचं

फोटोजच्या वेब व्हर्जनवर सुविधा

गुगल फोटोजच्या वेब व्हर्जनवर ही सुविधा देण्यात आली आहे. कम्प्युटरवर गुगल फोटोज ओपन केल्यानंतर, एखादा फोटो सिलेक्ट करून तुम्ही तो एडिट करू शकणार आहात. यामध्ये पोट्रेट लाईट, पोट्रेट ब्लर, डायनॅमिक, कलर पॉप, एचडीआर आणि स्काय असे एडिट फीचर्स दिले आहेत. यासोबतच अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

या अपडेटमध्ये ऑटोमॅटिक एडिट फीचर्स, नवीन अ‍ॅस्पेक्ट रेशिओ ऑप्शन्स, नवीन फोटो मॅन्युपलेशन टूल्स आणि नवीन अ‍ॅडजस्टमेंट ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

गुगल वन सबस्क्रिप्शन

गुगलचं हे फीचर वापरण्यासाठी तुमच्याकडे गुगल वनचं सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. सोबतच तुमच्या कम्प्युटरला कमीत कमी ४ जीबी रॅम असणं आवश्यक आहे. तसंच, तुमचं क्रोम ब्राऊजर हे पूर्णपणे अपडेट असायला हवं असं गुगलने स्पष्ट केलं आहे.

Google Photos
Google Pay : आता आधार नंबरच्या मदतीने बनवता येईल UPI अकाउंट; डेबिट कार्डची नाही गरज! पाहा कसं

फोटो तपासून सुचवेल एडिट

गुगलचं हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला फोटो ओपन करून एडिट बटणावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला पाच कंट्रोल ऑप्शन्स दिसतील. यामध्ये सजेशन्स आणि टूल्स हे दोन नवीन आयकॉन्स दिसतील. यामधील सजेशन्स पर्याय वापरल्यानंतर गुगल तुमचा फोटो एडिट करेल. वेगवेगळ्या प्रकारे एडिट केलेल्या काही फोटोंचे पर्याय तुम्हाला दिसतील. यातील तुम्हाला आवडलेला एडिटेड फोटो तुम्ही सेव्ह करू शकता.

Google Photos
AI Tool : कुठला ड्रेस घातल्यावर सगळे करतील तुमचं कौतुक? बॉडीनुसार आता गुगल ड्रेस सिलेक्ट करून देणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com