Google Pay : आता आधार नंबरच्या मदतीने बनवता येईल UPI अकाउंट; डेबिट कार्डची नाही गरज! पाहा कसं

आता तुम्ही आधार नंबरच्या मदतीने गुगल-पे वर रजिस्टर करू शकणार आहात.
Google Pay Aadhaar Number
Google Pay Aadhaar NumberEsakal

बऱ्याच वेळा बँकमध्ये अकाउंट असलेल्या व्यक्तींनी डेबिट कार्ड घेतलेलं नसतं. अशा वेळी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आवश्यक असणारं UPI अकाउंट उघडणं शक्य होत नाही. कारण UPI अ‍ॅपवर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासतेच. गुगलने मात्र आता अशा व्यक्तींसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून तुम्ही आधार नंबरच्या मदतीने गुगल-पे वर रजिस्टर करू शकणार आहात.

डेबिट कार्ड नसणाऱ्या मोठ्या वर्गाला यूपीआय पेमेंट सिस्टीमशी जोडणे, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे. अर्थात, यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंट, आणि आधार कार्डशी जोडलेला असणं गरजेचं आहे.

Google Pay Aadhaar Number
UPI Payment करताना या चुका टाळा नाहीतर, बँक खातं होईल रिकामं

असं जोडा अकाउंट

तुमचं बँक अकाउंट गुगल-पे ला लिंक करण्यासाठी अगदी सोपी प्रोसेस आहे. यासाठी तुम्हाला गुगल-पे अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. यानंतर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलेला नंबर एंटर करावा लागेल. यापुढील टप्प्यात तुम्हाला डेबिट कार्ड आणि आधार नंबर असे दोन पर्याय दिसतील. यातील आधार नंबर हा पर्याय निवडा.

यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला पिन सेटअप करण्याचा पर्याय दिसेल. हा पिन तुमच्या पेमेंटसाठीचा पासवर्ड असेल. हा पिन कोणासोबतही शेअर करू नका. यानंतर तुमचं यूपीआय अकाउंट तयार होईल.

Google Pay Aadhaar Number
Google Pay : G-pay वर मिळतोय हजारो रुपयांचा कॅशबॅक; पेमेंट करताना वापरा 'या' 5 ट्रिक्स

ठराविक बँका लिंक

गुगल-पे ची ही सेवा सध्या ठराविक बँकांनाच उपलब्ध आहे. मात्र, लवकरच सर्व बँकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

गुगल-पे पहिलं अ‍ॅप

सध्या ही सुविधा केवळ गुगल-पे अ‍ॅपवर उपलब्ध आहे. यासाठी गुगलने UIDAI सोबत पार्टनरशिप केली आहे. अशी सुविधा देणारं गुगल-पे हे पहिलंच अ‍ॅप ठरलं आहे. गुगलनंतर फोन-पे, पेटीएम असे इतर यूपीआय अ‍ॅप्सदेखील भविष्यात अशी सुविधा देण्याची शक्यता आहे.

Google Pay Aadhaar Number
Google Pay: 'गुगल पे' युजर्सला लागली लॉटरी! कंपनीनं पाठवले ८० हजारांचे रिवॉर्ड्स; वाचा काय घडलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com