Google I/O 2024 : जेमिनी 1.5, सर्च एआय अन् बरंच काही.. गुगलच्या इव्हेंटमध्ये काय-काय झालं लाँच? जाणून घ्या

या इव्हेंटमध्ये Gemini 1.5 Pro, Gemini Nano, गुगल फोटोजमध्ये Gemini AI आणि Gemini 1.5 Flash अशा कित्येक गोष्टींची घोषणा करण्यात आली.
Google I/O 2024 Announcements
Google I/O 2024 AnnouncementseSakal

Google I/O Event 2024 Announcements : गुगलचा बहुप्रतिक्षित वार्षिक डेव्हलपर इव्हेंट मंगळवारी रात्री पार पडला. या इव्हेंटमध्ये गुगलने जेमिनी संबंधित कित्येक प्रॉडक्ट्स आणि फीचर्सची घोषणा केली. जेमिनी हे गुगलचं एआय मॉडेल आहे. जगभरात सुमारे दोन अब्ज लोक जेमिनी वापरत असल्याचा दावा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यावेळी केला.

या इव्हेंटमध्ये Gemini 1.5 Pro, Gemini Nano, गुगल फोटोजमध्ये Gemini AI आणि Gemini 1.5 Flash अशा कित्येक गोष्टींची घोषणा करण्यात आली. काय आहेत हे प्रॉडक्ट्स आणि कसे असतील नवीन फीचर्स? जाणून घेऊया..

Gemini 1.5 Pro

गुगलने नुकतंच आपल्या जेमिनी या एआय मॉडेलचं सर्वात लेटेस्ट व्हर्जन लाँच केलं होतं. Gemini 1.5 Pro हे व्हर्जन आता जेमिनी Advanced च्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होईल असं सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं. या व्हर्जनमध्ये 1 मिलियन टोकन्स एवढी कंटेक्स्ट विंडो देण्यात आली आहे. खरंतर या मॉडेलची कंटेक्ट्स विंडो 2 मिलियन टोकन्स एवढी आहे. मात्र ही केवळ डेव्हलपर्सना उपलब्ध असेल.

Google I/O 2024 Announcements
Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Gemini App

गुगलच्या जेमिनी अ‍ॅपमध्ये काही नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. हे अ‍ॅप आता यूजर्ससोबत ऑडिओ संवाद देखील साधू शकेल. या फीचरला Live असं नाव देण्यात आलं आहे. GPT-4o प्रमाणेच हे फीचर काम करेल. Live फीचरचा रिस्पॉन्स अगदी नैसर्गिक बोलण्याप्रमाणेच असेल असं गुगलने स्पष्ट केलं. एवढंच नाही, तर जेमिनी अ‍ॅप हे आपल्या यूजर्ससाठी काही गोष्टींचा निर्णय देखील घेऊ शकेल. एखादी ट्रिप प्लॅन करणे, रेस्टॉरंट सर्च करणे अशा गोष्टी हे अ‍ॅप करू शकेल.

Gemini in Camera and Google Photos

गुगलने आपल्या कॅमेरा आणि गुगल फोटोज या अ‍ॅप्ससाठी देखील जेमिनीचे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. एआय फीचर्समुळे हे अ‍ॅप्स आता अधिक अ‍ॅडव्हान्स झाले आहेत. तुम्ही गुगल कॅमेरा अ‍ॅप उघडून एआयला थेट एखादा प्रश्न विचारू शकाल. एवढंच नाही, तर आपण कॅमेऱ्याने काय-काय पाहिलं हेदेखील एआय लक्षात ठेऊ शकेल. म्हणजेच, तुम्ही जर तुमच्या कॅमेऱ्याने रुमचा फोटो काढला असेल, आणि त्यात रिमोट दिसत असेल.. तर काही वेळाने "माझा रिमोट कुठे पाहिलास का?" असं या एआयला विचारल्यानंतर ते लगेच रुममध्ये कुठे रिमोट ठेवलेला आहे हे सांगू शकेल.

Google I/O 2024 Announcements
Google Speaking Practice : आता इंग्रजी बोलणं झालं सोपं! गुगलच्या 'जेमिनी' सोबत करता येईल सराव.. पाहा कसं?

Google Photos मध्ये एआय आल्यामुळे ते अधिकच अ‍ॅडव्हान्स झालं आहे. आता तुम्ही गुगल फोटोंना थेट विचारू शकता की तुमच्या गाडीचा नंबर काय आहे; ते लगेच तुमच्या सर्व फोटोंमध्ये जाऊन गाडीचे फोटो शोधेल आणि त्यावरील नंबर प्लेटवरुन तुमच्या गाडीचा नंबर सांगू शकेल.

यासोबतच गुगलने छोट्या आणि जलद कामांसाठी Gemini 1.5 Flash, Gemini for Workspace, Google Audio Overview, Imagen 3 in AI Labs, नवीन व्हिडिओ AI Tool अशा बऱ्याच गोष्टींची घोषणा गुगलने या इव्हेंटमध्ये केली. लवकरच हे फीचर्स लाँच केले जातील आणि सर्वांसाठी उपलब्ध होतील असं पिचाई यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com