खासगी फाइल ठेवण्यासाठी ‘सेफ फोल्डर’, ‘गुगल’चं नवं फीचर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

‘सेफ फोल्डर’मध्ये तुमच्या इमेज, व्हिडिओ, ऑडिओ फाइल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे इतरांपासून सुरक्षित ठेवली जातात. 

माउंटन व्ह्यू (अमेरिका) - सध्या स्मार्टफोनच्या दुनियेत डेटा सुरक्षिततेला महत्व आलं आहे. ऑनलाइन युगात कधी सायबर हल्ला होईल आणि खासगी डेटा चोरला जाईल हे कळणं कठीण आहे. गंमतीनं म्हटलं जातं की माणसाचा सगळ्यात जवळचा आणि सिक्रेट माहिती असलेला मित्र बनलाय मोबाइल. अशा या मोबाइलची आणि त्यात असलेल्या खासगी माहितीची सुरक्षाही महत्वाची आहे. यासाठी गुगलने खास फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे तुमचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट एका फोल्डरमध्ये सेफ ठेवता येणार आहेत.

मोबाईलमधील आपल्या खासगी फाइल ॲपमध्ये एका स्वतंत्र, पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये ठेवता येणार आहेत. गुगल कंपनीने यासाठी ‘सेफ फोल्डर’ हे नवीन फिचर लाँच केले आहे. यामुळे युजरला कोणतेही डॉक्युमेंट, फाइल किंवा मीडिया फाइल ॲपमधील सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल. हे ‘सेफ फोल्डर’ चार आकडी पिन क्रमांकाने सुरक्षित करण्यात आले आहे.  सध्या ‘गुगल फाइल्स’साठी हे फीचर बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून लवकरच ते इतरांसाठीही उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

हे वाचा - ट्विटरला टक्कर देणारं भारतीय 'Koo' लाँच

गुगलने ब्लॉगद्वारे ‘सेफ फोल्डर’ या ॲपची घोषणा केली. आपला मोबाईल घरातील इतर व्यक्तीही आणि मित्र-मैत्रिणीही सहज हाताळत असतात. लहान मुलांकडेही मोबाईल जातो. ही बाब सर्वसाधारण असली तरी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे किंवा कामासंदर्भात काही गोपनीय छायाचित्रे, कागदपत्रे असल्यास त्या इतरांकडून चुकून डिलीट होण्याचा अथवा त्याचा गैरवापर होण्याचा संभव असतो. ‘गुगल फाइल्स’मधील ‘सेफ फोल्डर’ हे फिचर तुमची वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवते. 

अनधिकृत ॲक्सेस नाही 
‘सेफ फोल्डर’मध्ये तुमच्या इमेज, व्हिडिओ, ऑडिओ फाइल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे इतरांपासून सुरक्षित ठेवली जातात. तुम्ही ॲपमधून बाहेर पडताच ते आपोआप लॉक होते. चार आकडी पिन क्रमांकाशिवाय ते ओपन होत नाही. यामुळे तुमचा मोबाईल घेऊन कोणीही हे ॲप उघडू शकत नाही. 

टेक्नॉलॉजीच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

डेटा राहील सुरक्षित
गुगलने बुधवारी नव्या सेफ फोल्डर फीचरची घोषणा त्यांच्या ब्लॉग पोस्टमधून करण्यात आली आहे. लहान मुलं, भावंडं यांच्या हातात मोबाइल दिल्यानंतर त्यातला खाजगी डेटा सुरक्षित राहण्यासाठी हा फोल्डर पर्याय ठरणार आहे. विशेषत: महिलांसाठी याचा उपयोग होणार आहे. तुमच्या खाजगी फाइल्स इतरांना ओपन करता येणार नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google launch safe folder for private files