घरबसल्या बोला शेजाऱ्यांशी, कसं? गुगल आहे ना!

google
google

पुणे : मी राहत असलेल्या भागात पार्क कोठे आहे आणि त्याची वेळ काय? या भागात हॉटेल कोणते चांगले आहे? मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे? असे असंख्य आपल्याला पडतात आणि तुम्ही राहत असलेल्या भागात तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी आता गुगल पुढे आहे. गुगलने 'Neighbourly'हे अॅप लॉन्च केले असून, या अॅपच्या माध्यमातून तुम्हा घरबसल्या परिसरातील (नेबरहूड) नागरिकांशी संवाद साधता येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन क्रांती घडविणाऱ्या 20 वर्षीय गुगलने आता हे अॅप लॉन्च करून नवे काही देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात सर्वप्रथम मुंबईत हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर जयपूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, म्हैसूर, कोईंबतूर, कोटा या शहरात अॅपला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता पुण्यात उद्यापासून (मंगळवार) या अॅपचा वापर करता येणार आहे. लवकरच हे अॅप कोलकता, चंदीगड, लखनौ, इन्दूरसह अन्य शहरात लॉन्च होणार आहे. गुगलमुळे हजारो लोक या अॅपच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. यासाठी कोणतीही ओळख दाखविण्याची गरज नाही.

या अॅपविषयी माहिती देताना गुगलचे वरिष्ठ व्यवस्थापक बेन फोहनेर म्हणाले, की या अॅपमुळे तुम्ही रस्त्यावर चालतानाही शेजाऱ्यांशी बोलू शकता. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून 1 ते 5 किमी अंतरापर्यंत काय-काय मिळू शकते, हे या अॅपमुळे शक्य होणार आहे. अॅपवरून स्थानिक भाषा किंवा इंग्रजीमध्ये संवाद साधू शकता. आपल्या नेबरहूडकडून तुम्हाला उत्तर मिळते यामध्ये गुगलचा कोणताही हस्तक्षेप नाही. व्हॉईस सर्च हे सुद्धा उपलब्ध असणार आहे. तुम्ही तुमच्या नेबरहूडमध्ये तीन परिसरांचा समावेश करू शकता. या अॅपमध्ये कोणत्याही व्यक्तीला फॉलो करता येत नाही किंवा त्याचे प्रोफाईल बघता येते.

अॅपविषयी थोडक्यात...
- आतापर्यंत 15 लाख नागरिकांकडून अॅप डाऊनलोड
- ऍण्ड्रॉईड जेलिबिन व त्यापुढील व्हर्जनवर हे ऍप उपलब्ध, आयफोनला नाही 
- पुण्यासह बंगळूर आणि दिल्लीत लॉन्च
- गुगल ठेवणार मजुकरावर लक्ष
- छोटे-छोटे प्रश्न सोडविण्यासाठी होणार अॅपचा वापर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com