
गुगलने त्यांचे २ नवीन एआय टूल्स लाँच केले आहेत. आय/ओ २०२५ मध्ये व्हीओ ३ आणि इमेजेन ४ लाँच करण्यात आले आहेत. VO3 हे एक व्हिडिओ निर्मिती साधन आहे. जे स्वतःहून ऑडिओ, संवाद आणि लिप-सिंकिंग जोडू शकते. तर इमेजेन ४ प्रतिमा तयार करते आणि २K रिझोल्यूशनपर्यंत चित्रे तयार करू शकते. ही दोन्ही एआय टूल्स जेमिनी, फ्लो आणि वर्कस्पेस सारख्या गुगल टूल्समध्ये जोडली जात आहेत.