Google Map Update : प्रवासादरम्यान मिळणार टोल टॅक्स रकमेची माहिती

आपल्यापैकी अनेकजण माहित नसलेली ठिकाणे शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापरत करत असतो.
Google maps
Google mapsSakal

Google Map : आपल्यापैकी अनेकजण माहित नसलेली ठिकाणे शोधण्यासाठी गुगल मॅपचा (Google Map) वापरत करत असतो. गुगलकडूननही वेळोवेळी वापरकर्त्यांना याचा वापर करणे आणि नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. असेच एक नवे अपडेट (Google Map Update) गुगलकडून गुगल मॅपसाठी देण्यात आले आहे. त्यानुसार गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला तुमच्या वाटेत असणाऱ्या टोलवरील (Toll Naka) संभव्य शुक्लाची माहिती देणार आहे. नवीन अपडेटनंतर, गुगल मॅप्सच्या वापरकर्त्यांना पेमेंट मोडसह टोल आणि त्याची किंमत याबद्दल माहिती उपलब्ध होणार आहे. गुगलचे हे नवीन उपडेट सुमारे 2,000 टोल रस्त्यांसाठी उपलब्ध आहे. (Google Map Update)

Google maps
अमेरिकेची भारताला धमकी; भविष्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम

नवीन अपडेटनंतर, तुम्ही Apple Watch मध्ये Google Maps वापरण्याची पद्धत बदलेल. आता ऍपल वॉचमध्ये (Apple Watch) स्वयंचलित नेव्हिगेशन (Navigation) दिसेल. वापरकर्ते आता ऍपल वॉचमध्ये "टेक मी होम" शॉर्टकट स्क्रीन देखील जोडण्यास सक्षम असतील, ज्याचा नंतर थेट वापरासाठी वापर केला जाऊ शकतो.

नव्या अपटेडमध्ये नेमकं काय?

गुगल मॅपने (Google Maps) जारी केलेल्या नवीन अपडेटमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या वाटेत असणाऱ्या टोलवरील शुल्काविषयी अंदाजे माहिती देण्यात येणार आहे. गुगलचे हे नवीन अपडेट सध्या iOS साठी उपलब्ध करन देण्यात आले असून हे अपडेट Apple Siri ला देखील सपोर्ट करणार आहे. म्हणजेच Apple Siri च्या मदतीने तुम्ही नेव्हिगेशन देखील वापरणे सहज शक्य होणार आहे.

Google maps
ऐकावे ते नवलचं ! तब्बल 90 वेळा घेतले कोरोना व्हॅक्सिन

या देशातील नागरिकांना होणार फायदा

भारत, इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेतील गुगल मॅप वापरणाऱ्यांना कोणत्याही प्रवासापूर्वी टोल चार्जेसची माहिती मिळेल, असे गुगलने म्हटले आहे. सध्या, हे अपडेट केवळ काही वापरकर्त्यांसाठी जारी केले गेले आहे परंतु या महिन्याच्या अखेरीस ते सर्वांसाठी जारी केले जाईल. इतर देशांमध्ये, हे अपडेट या वर्षाच्या अखेरीस येईल, असे गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com