गुगल मॅप आता पार्किंगही शोधणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नवी दिल्ली: आपल्याला रस्ते दाखविणारे गुगल आता गाडीसाठी पार्किंगची जागाही शोधणार आहे. गुगलमुळे सध्या कोणतीही गोष्ट चुटकीसरशी शोधता येते, अगदी एखाद्या जवळच्या पत्त्यापासून ते जगभरातल्या विमानांच्या वेळाही गुगल आपल्याला दाखवतो. आता गुगल मॅप्सच्या साह्याने युजर्सना ते जात असलेल्या ठिकाणच्या पार्किंगच्या स्थितीची माहितीही मिळणार आहे.

सध्या गुगल मॅप्सचे व्ही.9.44 बेटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना ही सुविधा उपलब्ध आहे. लवकरच ती सर्व युजर्सना उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु सध्या ही सुविधा काही ठराविक ठिकाणांसाठीच उपलब्ध असेल. हळूहळू ती सर्वत्र उपलब्ध होईल व तुम्ही कुठेही गेलात तरी पार्किंगची चिंता तुम्हाला सतावणार नाही. यामध्ये लिमिटेड, मीडियम आणि इझी असे तीन प्रकार गुगल मॅपमध्येच "पी' या नव्या आयकॉनसमोर फ्लॅश होणार असून, यामुळे इच्छितस्थळी पार्किंगची स्थिती युजर्सना मिळण्यास मदत होईल. प्रामुख्याने ही सुविधा मॉल्स, विमानतळ आणि प्रेक्षणीय स्थळांवर उपलब्ध असेल.

गुगल मॅपवरून हेही शोधा

  • उपहारगृह
  • पेट्रोल पंप
  • एटीएम
  • कॉफी शॉप्स
  • मेडिकल्स
  • सुपर मार्केट
  • हॉटेल्स
  • पब्स आणि बार
  • डीपार्टमेंट स्टोअर
  • पोस्ट ऑफिस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google map searching parking