गुगल मॅपमध्ये दुचाकीसाठी 'नेव्हिगेशन मोड'

वृत्तसंस्था
Wednesday, 6 December 2017

आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकदा आपण गुगल मॅपची मदत घोतो. ज्या रस्त्याने आपण जाणार त्या रसत्यावरची वाहतुक कोंडी, रस्ता कोठे मोकळा आहे हे देखील या ऍपमुळे आपल्याला कळते. वाहतूक कोंडी असेल तर पर्यायी मार्ग किंवा 'फास्टेस्ट रूट' एका क्लिकवर शोधणे याच मॅपमुळे शक्य झाले. आता या मॅपमध्ये दुचाकीस्वारांसाठी एक नवीन फिचर देणयात येणार आहे. यामध्ये दुचाकी नेव्हिगेशन मोड देण्यात येणार आहे.

रस्त्यावर वाहतुक कोंडी असल्यास दुचाकीस्वार कोणत्या रस्त्याने जाऊ शकतात याची वेगळी माहिती त्यांना मिळणार आहे. एखाद्या छोट्याशा गल्लितून जिथून दुचाकी सहज निघू शकते अशा रस्त्यांची माहिती आता गुगलमॅपवर उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे काही पूल किंवा काही रस्ते जे दुचाकीस्वारांसाठी बंद असतात त्याचीही माहिती या मॅपवर दुचाकीस्वारांना समजणार आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या दुचाकीस्वारांना या फिचरचा उपयोग होणार आहे. सध्या एँड्राईडवर या अॅपचे अपडेट्स उपलब्ध आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Maps Gets 'Two-Wheeler' Mode in India