गुगलचा सर्व्हर डाऊन, जीमेलसह अनेक सेवा वापरताना अडचणी

google
google

कॅलिफोर्निया - सोशल नेटवर्किंगवर #GoogleDown हा हॅशटॅग वापरून अवेक जण गुगलची तक्रार करत आहे. कारण जगप्रसिद्ध गुगल कंपनीच्या युझर्सला आज सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. भारतात अशा समस्या जाणवत नसल्या तरी, अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये हा अनुभव युझर्सला येत आहे. 

गुगलने आपल्या सर्व्हिस वेबसाईटवर दिलेल्या एका परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, जीमेल वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीसंदर्भातील समस्यांचा तपास करत असल्याचे म्हटले आहे. 

जीमेल - 
यासंदर्भात जीमेलच्या युझर्सला लवकरच सविस्तर महिती दिली जाईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. गुगलचे अकाउंट लॉगइन करता येत असले तरी मेसेज पाठवताना एरर येणे, मेल पोहचण्यास वेळ लागणे, मेल उघडण्यास वेळ लागणे तसेच अकाउंट रिफ्रेश होण्यास वेळ लागण्यासारख्या समस्यांचा समाना युझर्सला करावा लाहत आहे. करावा लागत आहे.

गुगल ड्राइव्ह - 
जीमेलबरोबरच गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्यांनाही अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे गुगलने म्हटले आहे. याबद्दल आम्ही थोड्याच वेळात माहिती पुरवु असे कंपनीने म्हटले आहे. 

गुगल मॅप्स - 
गुगल मॅप्स वापरणाऱ्या काही युझर्सला अडचणी येत आहे. गुगल मॅप्सवर स्ट्रीट व्ह्यू पाहण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण स्क्रीन ब्लँक होत असल्याची तक्रार युझर्सने केली आहे.

जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील युझर्सला टप्प्याटप्याने या समस्यांचा समाना करावा लागत असल्याचे दिसत आहे. 

या गोंधळामागील कारण अद्याप गुगलने स्पष्ट केलेली नाही. तसेच ही अडचण किती काळ राहणार आहे यासंदर्भातही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com