
सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
नवी दिल्ली- सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे मोठ्या टेक कंपन्यांना भारतीय नेटकऱ्यांच्या गरजांनुसार आवश्यक ते बदल करावे लागतात. यात पार्श्वभूमीवर भारतीय युजर्सच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेऊन गुगल मॅपने (Google Maps) काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
भारतात अनेकजण नेव्हिगेशनसाठी गुगम मॅपचा वापर करतात. गुगल मॅप केवळ इंग्रजी भाषेतच लोकेशन दाखवत असते. अशावेळी इंग्रजी न येणाऱ्या युजर्संना यामुळे काही बंधनं येतात. भारतातील युजर्सची ही अडचण दूर करण्यासाठी कंपनीने गुगल मॅप सेवा स्थानिक भाषेतून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुगल मॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
WhatsApp Web साठी नवं फिचर; फेस आयडी, फिंगरप्रिंट पुरवणार अधिक सुरक्षा
टेक कंपन्यांसाठी भारतीय युजर्स महत्त्वाचे आहेत. त्यांना भारतीय युजर्सच्या गरजांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. त्याचमुळे कंपनीने गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन (Automatic Transliteration) सिस्टिम सुरू करण्याची घोषणा केली. इंग्रजी न येणाऱ्या युजर्संना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना आपल्या भाषेतही गुगल मॅप वापर करता येणार आहे. त्यामुळे एखादा पत्ता शोधताना येणाऱ्या अडचणी त्यांना यापुढे येणार नाहीत.
हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू या 10 भाषांमध्ये गुगल मॅपची सेवा वापरता येणार आहे. गुगलले एका ब्लॉग पोस्टद्वारे 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे.