esakal | आता 'Google Meet'मधून घ्या 'व्हिडिओ कॉलिंग'चा आनंद; कंपनीनं आणली भन्नाट फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

आता 'Google Meet' मधून घ्या 'व्हिडिओ कॉलिंग'चा आनंद

आता 'Google Meet' मधून घ्या 'व्हिडिओ कॉलिंग'चा आनंद

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोरोना काळानंतर Google Meet ला अधिक महत्व आले आहे. आज आॅफिस, शाळा,काॅलेजसमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामध्ये आपण आॅडिओ किंवा व्हिडीओ, मेसेज चा वापर करतो. मात्र आता कंपनीने नविन इफेक्ट्स वापरले आहेत. याबाबत गुगलने ट्वीट ही केले आहे. या नविन इफेक्ट्स चा आपल्याला काय फायदा होणार आहे चला जाणून घेऊया.

व्हिडिओ कॉलिंग अॅप्लिकेशन Google मीटने अलीकडेच iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक कॉल एंटरटेनमेंट करण्यासाठी त्याच्या प्लॅटफॉर्मवर नवीन व्हिडिओ फिल्टर आणि इफेक्ट्स प्लेटफॉर्म अपडेट केले आहेत.ज्यात AR मास्क ड्युओ-स्टाइल फिल्टर आणि यूनिक इफेक्ट्स आहेत. आता गूगल मीट वरून नविन इफेक्ट्स वापरून आपल्या पर्सनल कॉल्समध्ये मनोरंजनाचा सहभाग वाढवू शकता.

गुगलने ट्वीट केले आहे की नवीन कॉलरचे फिल्टर्स आणि अ‍ॅनिमेटेड ए.आर. फेस इफेक्टसमध्ये एंट्री करण्यासाठी कॉल दरम्यान यूजर्स व्हिडिओ फीडच्या तळाशी उजव्या स्पार्कल चिन्हावर टॅप करु शकतात. अहवालानुसार आपण मीट अ‍ॅप ऐवजी जीमेलच्या माध्यमातून मीटिंग सुरू केले तरीही हे नवीन बदल आधीपासून लाइव आहेत.बरेच पर्याय केवळ वैयक्तिक जीमेल खात्यांसाठी उपलब्ध असतात. तर वर्कस्पेस वापरकर्त्यांकडे अस्पष्ट आणि वर्चुअल बैकग्राउंड(आभासी) ऑप्शन सारखे लिमिटेड ऑप्शन आहेत. जे कॉल्सला प्रोफेशनल बनवण्यासाठी मदत करतील.

फ़िल्टर Google च्या ग्राहक-केंद्रित ड्युओ व्हिडिओ चॅट सेवेसाठी फिल्टर्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. 9to5Google च्या मते, कंपनी ड्युओ विथ मीटची जागा घेण्याच्या विचारात आहे. टेक दिग्गजने जूनमध्ये त्याच्या गुगल मीट अॅपमध्ये इतरही बदल केले होते.

Google मीटमध्ये नवीन अॅड फीचर्स

गेल्या काही महिन्यांपासून गुगल मीटमध्ये बरीच अॅड फीचर्स आणि सुधारणा मिळत आहेत. अगदी अलीकडेच, एक नवीन अपडेट केले आहे, जे मीटिंग सुरु असताना मध्येच हाताचा इशारा करू शकतो. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सत्रादरम्यान वापरकर्त्यांनी हाताचा इशारा केल्यास ओळखता यावे या उद्देशाने हे अपडेट केले आहे. ज्यासाठी अ‍ॅपने व्हिडिओ टाइलवर एक चांगले व्हिज्युअल चिन्ह आणि अ‍ॅनिमेशन सादर केले आहे. तसेच थेट लाइव स्ट्रीम मागणी पाहून कंपनीने आपल्या लाइव स्ट्रीममध्ये कॅप्शन जोडण्याचा पर्याय इंस्टॉल केला होता.

loading image