‘गुगल वन टॅप’ उपक्रमातून ‘सकाळ’ची गगनभरारी

'गुगल वन टॅप'च्या माध्यमातून अडथळ्याशिवाय एका क्लिकवर साइनअप
sakal is on google one tap
sakal is on google one tap Esakal

मुंबई : भारतीय भाषेतील अग्रगण्य माध्यम 'ई सकाळ'ने आता गुगलच्या नव्या उपक्रमात सहभागी होत वाटचाल अधिक समृद्ध केली आहे. जगभरातील वाचकांना खऱ्या आणि दर्जेदार बातम्या, प्रीमियम कन्टेन्ट, उत्तमोत्तम लेख वाचता यावेत आणि स्वनिर्मिती असलेले (First hand content) साहित्य वाचता यावे, यासाठी 'ई सकाळ'ने गुगलच्या 'गुगल वन टॅप' उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत १ लाख ३० हजार वाचक वाढण्यास मदत झाली आहे. तर सदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या ८.५ टक्क्यांनी वाढली आहे. सकाळसाठी ही जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

प्रयोगशील 'सकाळ'

सकाळ डिजिटलमधील eSakal.com या न्यूजवेबसाईटवर 'साइन-इन पेज' सहजगत्या उपलब्ध होत नव्हते. यामुळे वाचकांनी त्यांच्या संमतीनेच शेअर केलेला डेटा एकत्रित करणे आणि वाचकांना दर्जेदार अनुभव देणे हे आव्हानात्मक होते.

पारंपरिक 'साइन-अप' प्रक्रिया क्लिष्ट ठरू शकते आणि त्यामुळे संकेतस्थळाला भेट देणारा वाचक; विशेषतः डेटा सुरक्षिततेला प्राधान्य देणारे, वेग आणि सुविधेला महत्व देणारे तंत्रज्ञानप्रेमी आणि यातील जाणकार असलेले वाचक आपल्यापासून दूर जाऊ शकतात, ही बाब 'सकाळ'ने अचूकपणे ओळखली.

गुगल वन टॅप' सकाळसाठी परिवर्तन करणारे ठरले आहे. एकाच व्यासपीठामुळे वाचकांना नोंदणी करणे अधिक सुलभ झाले आहे. वाचकांची टिकून राहण्याची क्षमता वाढली आहे. तसेच यामुळे सकाळच्या वाचकांपर्यंत नव्या पद्धतीने पोचण्याचा आणि स्मार्ट पद्धतीने मार्केटिंग करण्याचा नवा मार्ग आम्हाला सापडला आहे. या उपक्रमाने आमच्या वाचकांच्या संख्येत भर घातली असून वाचकांसोबतचे नाते आधी दृढ झाले आहे. "
स्वप्नील मालपाठक, बिझनेस हेड, सकाळ डिजिटल

‘गुगल वन टॅप’ का?

'गुगल वन टॅप'च्या माध्यमातून अडथळ्याशिवाय एका क्लिकवर साइनअप करता येते. वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी वाचकांना आपल्या गुगल अकाउंटचा वापर करता येणार आहे. यासाठी फक्त एक क्लिक करावे लागते. त्यामुळे फॉर्म भरण्यासारखी दीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार नाही. 'गुगल वन टॅप' हे व्यापक व्यावसायिक लक्ष्य गाठण्यासाठी मदत करणारे एक उपयुक्त आणि परिपूर्ण साधन आहे, हे 'सकाळ'च्याही लक्षात आलं आहे.

वन टॅपचे फायदे काय?

  • नवीन वाचकवर्ग वाढवणे आणि जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करण्याची प्रक्रिया सुनिश्चित करणे

  • वाचकांना चांगला अनुभव आणि त्यांचा सहभाग वाढवणे

  • लक्ष्याधारित 'मार्केटिंग'साठी व्हॅल्यूएबल यूजर डेटाचा अॅक्सेस देणे.

  • उच्चतम सुरक्षितता आणि संस्थेबद्दलची विश्वासार्हता वाढवणे.

  • वन टॅप लॉगिनसह Esakal.com रीमार्केटिंगसाठी यूजर डेटाचा लाभ देऊ शकतं. फक्त खास सदस्यांसाठी ऑफर आणि सवलत दिली जाऊ शकते. तसेच आतापर्यंत नियमित सदस्य न झालेले वाचक आमचे नियमित सदस्यही होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com