Google Pay: 'गुगल पे' युजर्सला लागली लॉटरी! कंपनीनं पाठवले ८० हजारांचे रिवॉर्ड्स; वाचा काय घडलंय

पैसे मिळाल्यानंतर अनेक युजर्सनी याचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. त्याची दखल खरंतर इलॉन मस्कनंही घेतली.
google pay
google pay

नवी दिल्ली : गुगल पे वापरणाऱ्या काही युजर्सना कंपनीनं मोठा बोनस दिल्यानं एकच खळबळ उडाली होती. तब्बल ८०,००० रुपये मिळाल्यानं या युजर्सना लॉटरची लागली होती. गुगल पे अॅपमध्ये एक ग्लिच निर्माण झाल्यानं हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गुगल पे च्या या रिवॉर्डची इलॉन मस्कनं देखील दखल घेतली आणि छान असं म्हटलं.

google pay
घरोघरी सिलेंडर पोहोचवण्यापासून IPLपर्यंतचा रिंकूचा प्रवास पाहा : Rinku Singh

नक्की काय घडलंय?

ट्विटरवर एका युजरनं आपला अनुभव लिहिताना एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला. यामध्ये त्याला गुगल पेकडून ४६ डॉलरचा अर्थात ३,७७० रुपयांचा रिवॉर्ड मिळाला आहे. त्यानं म्हटलं की, गुगल पे ओपन करताच मला रिवॉर्ड मिळाला. रिवॉर्ड कसं चेक करायचं हे देखील त्यानं यामध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर आणखी एका युजरनं पोस्ट केली की, गुगल पेकडून त्याला १०७२ डॉलर अर्थात ८७,८६५ रुपयांचा रिवॉर्ड मिळाला आहे.

google pay
Kajal Hindustani: नुपूर शर्मानंतर आता काजल हिंदुस्तानी! हेटस्पीचमुळं राम नवमीला उसळली दंगल, कोठडीत रवानगी

पण आता अशा प्रकारचा रिवॉर्ड मिळणं बंद झालं आहे. याचं कारणही कंपनीनं सांगितलं असून कंपनीनं सांगितलं की, हा एक ग्लिच अर्थात तांत्रिक बिघाड असून त्यामुळं हा सर्व गोंधळ निर्माण झाला होता. तसेच रहमान नामक एका युजरनं एका ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं की, गुगलनं अशा प्रकारचे ईमेल पाठवले असून चुकून पैसे युजर्सच्या खात्यात गेल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्यांना हे पैसे पाठवले त्या शक्य तितक्या लोकांकडून पैसे ऑटोमॅटिक परतही घेण्यात आले आहेत.

google pay
प्रवाशाची क्रू मेंबरला मारहाण! Air Indiaचं दिल्ली-लंडन विमान अर्ध्यातूनच परतलं

विशेष म्हणजे ज्या युजर्सना अशा प्रकारचे रिवॉर्ड मिळाले होते आणि त्यांनी हे पैसे मिळताच तात्काळ खर्च केले. त्यांच्याबाबत गुगल पे नं कुठलीही कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे, तसेच त्यांच्याकडून पैसेही परत घेणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे, त्यामुळं अशा युजर्सची खरचं लॉटरी लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com