'गुगल पे' वापरणे होणार आणखी सोपे; नुसते बोलून होतील पैसे ट्रांसफर | Google for India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google-pay

'गुगल पे' वापरणे होणार आणखी सोपे; नुसते बोलून होतील पैसे ट्रांसफर

Google ने त्याच्या UPI आधारित पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay साठी नवीन फीचर्सची जाहीर केली आहेत. कंपनीने दावा आहे की, या नवीन फीचर्समुळे यूजर्सना गुगल पे वापरुन व्यवहार करणे आणखी सोपे जाणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, गुगल पे वापरुन दरवर्षी सुमारे 15 अब्ज डिजिटल व्यवहार होतात त्यामुळे गुगलने गुगल पे साठी ग्रुप पेमेंट (Group Payment Feature) सारख्या भन्नाट फीचरची घोषणा केली आहे, चला तर मग जाणून घेऊया सविस्तर

काय असतील नवीन फीचर्स

कंपनीचा दावा आहे की, Google Pay च्या नवीन ग्रुप पेमेंट फीचरच्या मदतीने ग्रुपमधील अनेक लोक पेमेंट करू शकतील. तसेच एकाच वेळी अनेक लोकांशी पैशाचे व्यवहार करता येतील. याशिवाय GPay ला अधिक युजर फ्रेंडली बनवण्यासाठी गुगलकडून हिंग्लिश (Hinglish) भाषेला सपोर्ट केला जात आहे. पुढच्या वर्षाच म्हणजेच 2022 मध्ये Google Pay अॅपमध्ये हिंग्लिश भाषा उपलब्ध होईल. गुगलच्या मते, हिंग्लिश भाषेला सपोर्ट करणारे Google हा पहिला UPI पेमेंट प्लॅटफॉर्म असेल.

हेही वाचा: भारतासाठी गुगलच्या अनेक घोषणा; युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

Bill Split

हे फीचर ग्रुप पेमेंट सारखे काम करते. यामध्ये यूजर्स एकाच वेळी अनेकांना पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. समजा तुम्हाला 315 रुपये चार लोकांना ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर जाऊन 1260 रुपये टाकावे लागतील. यानंतर चार जणांची नावे निवडावी लागतील. यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 315 रुपये ट्रान्सफर होतील. खास गोष्ट म्हणजे, Google चे आगामी लॉन्च स्पीच टू टेक्स्ट (Speech to Text) आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स थेट बोलून इतर बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी वापरकर्त्यांना हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलून बँक खाते क्रमांक टाकावा लागेल.

My Shop

Google Pay साठी कंपनी नवीन My Shop फीचर देखील देणार असून, याच्या मदतीने लहान दुकानदार गूगल पे अॅपवर त्यांची सर्व उत्पादने लिस्ट करु शकतील. यासोबतच तुम्हाला दिवसभरातील व्यवहारांची माहिती देखील मिळेल. तसेच प्रोडक्टची किंमत देखील येथे लिस्ट करता येईल.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

loading image
go to top