Google App Security : स्पॅम फ्रॉड कॉलना कायमचा लागणार ब्रेक; फोनमधल्या गुगल अ‍ॅपला अपडेट, नवं फीचर कसं वापराल? वाचा एका क्लिकवर

Google Mobile App Security Spam Calls : गुगल फोन अ‍ॅपमध्ये नवीन कॉल फिल्टरिंग अपडेट आल्याने वापरकर्त्यांना स्पॅम कॉल्स पासून वाचवणे सोपे होईल.
Google Mobile App Security Spam Calls
Google Mobile App Security Spam Callsesakal
Updated on

सतत येणारे स्पॅम कॉल्स आणि अनोळखी नंबरमुळे त्रस्त असलेल्या Android यूजर्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गुगलने आपल्या Phone अ‍ॅपमध्ये नव्या कॉल फिल्टरिंग फीचरचा समावेश केला आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कॉल्सचा अधिक चांगल्या प्रकारे गटानुसार मॅनेजमेंट करता येणार आहे.

Google Phone अ‍ॅपचा नवीन अपडेट

गुगलच्या नवीन कॉल फिल्टरिंग फीचर अंतर्गत, आता तुमच्या कॉल लॉगमध्ये येणारे सर्व कॉल्स वेगवेगळ्या श्रेणीत विभागले जातील, त्यामुळे स्पॅम कॉल्स सहज ओळखता येतील आणि गरजेचे कॉल पटकन शोधता येतील.

कॉल फिल्टरिंग

  • All Calls (सर्व कॉल्स)

  • Missed Calls (मिस कॉल्स)

  • Contacts (सेव्ह केलेले नंबर)

  • Spam Calls (स्पॅम कॉल्स)

  • Non-Spam Calls (नॉन-स्पॅम कॉल्स)

यामुळे अनावश्यक कॉल्सच्या गर्दीतून महत्त्वाचे कॉल्स पटकन शोधता येतील. मात्र, इनकमिंग किंवा आउटगोइंग कॉल्सनुसार फिल्टर करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाही.

Google Mobile App Security Spam Calls
Aaple Sarkar Chatbot : तुमचं व्हाट्सअ‍ॅप बनणार सेतू कार्यालय; मिनिटांत मिळणार कोणतेही शासकीय प्रमाणपत्र अन् बस तिकिट,कशी वापराल ही सुविधा?

सर्व Android यूजर्सना कधी मिळणार हे फीचर?

हा अपडेट प्रथम Pixel स्मार्टफोन्सवरील बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र, आता Android यूजर्ससाठी टप्प्याटप्प्याने (server-side rollout) हे फीचर जारी केले जात आहे. त्यामुळे काहींना हा अपडेट लगेच मिळेल, तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.

तुमच्या फोनवर हे फीचर मिळवण्यासाठी-

  • Google Play Store वर जाऊन Google Phone अ‍ॅप अपडेट करा.

  • जर फीचर दिसत नसेल, तर काही काळ प्रतीक्षा करा, कारण हे हळूहळू सर्व युजर्सपर्यंत पोहोचत आहे.

Google Mobile App Security Spam Calls
Sunita Williams Update : सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल मोठी अपडेट! पृथ्वीवर कधी, कुठे अन् कशा येणार? सर्व डिटेल्स एका क्लिकवर

गुगलच्या स्पॅम कॉल्सविरोधातील इतर स्मार्ट उपाय

  • Call Screen (Pixel स्मार्टफोन्ससाठी) – AI-पावर्ड असिस्टंट तुमच्या वतीने कॉल उचलतो, कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवतो आणि कॉलचा उद्देश सांगतो.

  • Reverse Lookup Tool – अज्ञात नंबर शोधून त्याचा स्रोत समजण्यास मदत करते, त्यामुळे स्पॅम कॉल्स सहज टाळता येतात.

सध्या फसवणुकीचे कॉल्स आणि स्पॅम कॉल्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे गुगलचा हा अपडेट Android यूजर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तुमच्या फोनवर हा अपडेट आला आहे का? जर नाही, तर लवकरच मिळेल, त्यामुळे Google Phone अ‍ॅप अपडेट करत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com