
गुगल बहुप्रतिक्षित पिक्सेल 10 सिरीज उद्या लाँच करणार आहे.
याच्या बद्दल स्मार्टफोन प्रेमींमध्ये उत्सुकता आहे
चला तर मग जाणून घेऊया, Google Pixel 10 बद्दल सर्वकाही..
गुगल बहुप्रतिक्षित पिक्सेल 10 सिरीज उद्या 20 ऑगस्टला लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये पिक्सेल 10, 10 प्रो, 10 प्रो एक्सएल आणि 10 प्रो फोल्ड असे चार शानदार मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. लाँचपूर्वीच लीक झालेल्या माहितीमुळे स्मार्टफोनप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा गुगलने डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल घडवले असून ही सिरीज स्मार्टफोन बाजारात नवा बेंचमार्क ठरेल अशी अपेक्षा आहे.