Google Pixel 7, Pixel 7 Pro: लॉंच होण्यापूर्वीच लीक झाले फीचर्स, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google pixel 7 and pixel 7 pro design colour options teased check details here

Google Pixel 7, Pixel 7 Pro: लॉंच होण्यापूर्वीच लीक झाले फीचर्स, वाचा डिटेल्स

तुम्ही चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवसात Google चे आगामी फोन Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार आहेत. भारतात Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे लॉन्चिंग 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे, परंतु त्यापूर्वी फोनचे डिझाइन आणि फीचर्स समोर आले आहेत. चला तर मग या फोन्समध्ये काय खास असेल जाणून घेऊयात..

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro व्यतिरिक्त, Pixel Watch आणि Pixel Buds Pro चे लॉन्चिंग देखील 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गुगल इंडियाने त्याचा एक टीझर व्हिडिओही जारी केला आहे. आता या दोन्ही पिक्सेल फोनचा एक नवीन व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये फोनचे डिझाइन पाहिले जाऊ शकते. दोन्ही फोनची विक्री ही Amazon India वरून केली जाऊ शकते.

हा फोन गुगलच्या स्टोअरवर ऑनलाइन लिस्टही करण्यात आला आहे, ज्यामध्ये पिक्सेल 7 ऑब्सिडियन, लेमॉन्ग्रास आणि स्नो फिनिशिंग कलरमध्ये उपलब्ध असेल. त्याच वेळी, Pixel 7 Pro ला Obsidian, Hazel आणि Snow कलरमध्ये खरेदी करता येईल. ग्लॉसी ग्लास फिनिश दोन्ही फोनमध्ये उपलब्ध असेल, जे Pixel 6 आणि Pixel 6 Pro सारखेच असेल.

हेही वाचा: टाटाने लॉंच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत-रेंज

Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची संभाव्य फीचर्स

या दोन फोनची पहिली झलक Google ने या वर्षी मे महिन्यात Google I/O 2022 मध्ये दाखवली होती. असे म्हटले जात आहे की या दोन्ही फोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर मिळेल जो Pixel 6, Pixel 6 Pro आणि Pixel 6a मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसरची अपग्रेडेड आवृत्ती असेल.

Pixel 7 ला 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाचा फुल HD + डिस्प्ले मिळू शकतो. त्याच वेळी, Pixel 7 Pro बद्दल असे सांगितले जात आहे की यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा QHD + OLED डिस्प्ले मिळेल. फोन 12 GB पर्यंत रॅम मिळू शकतो आणि स्टोरेज 256 GB पर्यंत उपलब्ध असेल.

हेही वाचा: Jio Phone 5G: 'जिओ'च्या पहिल्या 5G फोनची किंमत उघड! 'या' फीचर्ससह होणार लॉंच

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, Pixel 7 ला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल, तर दुसरा लेन्स 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल असेल. Pixel 7 Pro सह तीन रियर कॅमेरे उपलब्ध असतील, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सेल असेल. दोन्ही फोनमध्ये 11-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

टॅग्स :Google