
पिक्सेल 10 च्या लाँचपूर्वी पिक्सेल 9 ची किंमत 27,000 रुपयांनी कमी होऊन 64,999 रुपये झाली.
यात टेन्सर G4 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 4,700 mAh बॅटरीसह प्रीमियम फीचर्स आहेत.
बँक डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआयमुळे हा सौदा अधिक आकर्षक आहे.
गुगलने आपला बहुचर्चित पिक्सेल 10 मालिकेचा लाँच 21 ऑगस्टला होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पिक्सेल 9 च्या किमतीत तब्बल 27,000 रुपयांची कपात केली आहे. भारतात आता हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 64,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय पर्यायांमुळे हा सौदा अधिकच आकर्षक झाला आहे. प्रीमियम फीचर्स आणि शक्तिशाली हार्डवेअरसह हा फोन नवीन मॉडेलची गरज नसलेल्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे.