Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या

Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या

Google Pixel Watch लॉन्च होण्याची वाट पाहत आहात आणि किंमत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, लॉन्च होण्यापूर्वीच गुगलच्या पहिल्या घड्याळाची किंमत उघड झाली आहे. एका रिपोर्टनुसार, वाय-फाय व्हेरिएंटसाठी Google Pixel Watch ची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे.

वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेल्ससाठी कलर ऑप्शन्स देखील ऑनलाइन शेअर केले गेले आहेत. ऑगस्टमधील मागील रिपोर्टमध्ये गुगल पिक्सेल वॉचच्या सेल्युलर व्हेरिएंटच्या किंमतीबाबत सूचक विधान करण्यात आले होते. गुगल 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10am ET (7:30pm IST) ला 'मेड बाय गुगल' लॉन्च इव्हेंटचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे, ज्या मध्ये कंपनी नवीन स्मार्टवॉच आणि Google Pixel 7 सीरीजचे अनावरण करेल.

Google Pixel Watch ची किंमत किती असेल?

काही सुत्रांचा हवाला देत, 9to5Google ने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, US मध्ये Google Pixel Watch ची किंमत फक्त Wi-Fi व्हेरिएंटसाठी $349.99 (अंदाजे रु 28,000) पासून सुरू होईल.मागील रिपोर्टनुसार Google Pixel च्या सेल्युलर व्हेरिएंटची किंमत US मध्ये $399 (अंदाजे रु 31,900) असेल.

9to5 Google रिपोर्ट दोन्ही कलर व्हेरिएंटबद्दल अधीकची माहिती देणय्यात आली आहे. गुगल पिक्सेल वॉचचे फक्त वाय-फाय व्हेरिएंट ब्लॅक/ऑब्सिडियन, गोल्ड/हेझेल आणि सिल्व्हर/चॉक कलर पर्यायांमध्ये येईल असे म्हटले जाते.आगामी स्मार्टवॉचची सेल्युलर व्हेरिएंट ब्लॅक/ऑब्सिडियन, सिल्व्हर/चारकोल आणि गोल्ड/हेझेल कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

हेही वाचा: ABG Shipyard Scam : 22 हजार कोटींचा घोटाळा! शिपयार्डच्या माजी अध्यक्षांना अटक

Google ने आधीच जाहीर केले आहे की ते 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10am ET (PM 7:30 IST) 'मेड बाय गुगल' लॉन्च इव्हेंटचे आयोजन करणार आहे. इव्हेंट दरम्यान, कंपनी Google Pixel Watch आणि Google Pixel 7 सीरीजसह प्रॉडक्ट रेंज सादर करेल. असेही सांगितले जात आहे की गुगल पिक्सेल वॉच 4 नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

गुगल पिक्सेल वॉचचे स्पेसिफिकेशन्स

गुगल पिक्सेल वॉच या वर्षी मे मध्ये गुगल I/O इव्हेंटमध्ये पहिल्यांदा जाहीर करण्यात आले होती. आगामी स्मार्टवॉच Wear OS च्या लेटेस्ट आवृत्तीवर चालेल. हे डिस्प्लेवर कमीत किमान बेझल्स आणि गोलाकार डायल सह येईल. यामध्ये कर्व्ह्ड ग्लास संरक्षण आणि स्टेनलेस-स्टील बिल्ड देखील असेल. नवीन स्मार्टवॉचमध्ये गुगल असिस्टंट, गुगल मॅप्स आणि गुगल वॉलेट सपोर्ट देखील असेल.गुगल पिक्सेल वॉचला हार्ट रेट ट्रॅकिंग आणि स्लीप मॉनिटरिंग यासारखी आरोग्य-संबंधित वैशिष्ट्ये मिळतील. कंपनीनुसार, स्मार्टवॉच फाइंड माय डिव्हाईस अॅपसोबतही काम करेल.

हेही वाचा: Splendor Plus : हीरोची स्प्लेंडर प्लस आली नव्या अवतारात, जाणून घ्या किंमत

Web Title: Google Pixel Watch Price Leaked Ahead Of Launch On October 6 Check Colour Option Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Google