Splendor Plus : हीरोची स्प्लेंडर प्लस आली नव्या अवतारात, जाणून घ्या किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hero introduces a new colour scheme for splendor plus check price

Splendor Plus : हीरोची स्प्लेंडर प्लस आली नव्या अवतारात, जाणून घ्या किंमत

हीरो मोटोकॉर्पने Splendor Plus चा नवीन रंग पर्यायायांसह सादर केली आहे. ही मोटारसायकल आता नवीन सिल्व्हर नेक्सस ब्लू कलर पर्यायासह देखील देण्यात येईल. याशिवाय स्प्लेंडर ब्लॅक विथ पर्पल, हेवी ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, मॅट शील्ड गोल्ड आणि ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड या रंगाच्या पर्यायांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. Hero Splendor Plus किंमत 70,658 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल 97.2cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंधन-इंजेक्टेड इंजिनसह देण्यात येते. जी 7.9 bhp @ 8,000 rpm आणि 8.05 Nm @ 6,000 rpm टॉर्क जनरेट करते. इंजिन चार-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. बाइकला स्टार्ट/स्टॉप सिस्टीम, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम आणि ड्रम ब्रेक देखील मिळतात.

हेही वाचा: OnePlus Nord Watch : येतेय वनप्लसची परवडणारी स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

पुढील महिन्यात येणार पहिले इलेक्ट्रिक मॉडेल

हीरो मोटोकॉर्प कंपनी पुढील महिन्यात भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन (EV) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लॉन्चसह, कंपनी इलेक्ट्रिक वाहन बाजारात देखील दमदार प्रवेश करेल. Hero MotoCorp ने यावर्षी मार्चमध्ये सांगितले होते की त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यावरण, सामाजिक आणि ऑपरेशन (ESG) सोल्यूशनवर $100 दशलक्ष (सुमारे 760 कोटी) ची गुंतवणूक उभी केली आहे. Hero MotoCorp आपल्या Vida ब्रँड अंतर्गत पुढे येत असलेले नवीन ट्रांनपोर्ट ऑप्शन्स सादर करण्याची योजना आखत आहे.

हेही वाचा: सोशल मिडीयावर चर्चेत असलेल्या 'त्या' डुप्लिकेट एकनाथ शिंदेंवर पुण्यात गुन्हा

Web Title: Hero Introduces A New Colour Scheme For Splendor Plus Check Price

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Hero Motorcorp