आता गुगलची 'ही' सेवा होणार बंद!

आता गुगलची 'ही' सेवा होणार बंद!

नवी दिल्ली : जगभरात सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुगलची Google Play Artist Hub ही सेवा आता बंद केली जाणार आहे. Google Play Artist Hub ही सेवा येत्या 30 एप्रिलला बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता युजर्सना या अ‍ॅप्लिकेशनवर लॉग-इन करता येणार नाही. 

Google Plus आणि Inbox by Gmail या सेवा गुगलकडून यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर Google Play Artist Hub बंद केली जाणार आहे. Google Play Artist Hub वर आपल्या आवडत्या गीतकार, संगीतकारांची गाणी ऐकण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येत आहे. मात्र, आता ही सेवा 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवली जाणार असून, त्यानंतर म्हणजे 1 मेनंतर या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. 

काय आहे Google Play Artist Hub?

Google Play Artist Hub ही सेवा गुगलकडून 2012 मध्ये सुरु करण्यात आली होती. या सेवेच्या माध्यमातून सबस्क्राईब केल्यानंतर हवी ती गाणी आपण ऐकू शकत होतो. मात्र, आता हे बंद होणार असल्याने अनेक युजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com