Google Play Store
Google Play Storeesakal

Google Play Store : गुगलच्या युझर्ससाठी आनंदाची बातमी.! एकाचवेळी अनेक ॲप्स डाऊनलोड करता येणार

Google Play Store : तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनचा वापर करत असाल तर, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

Google Play Store : टेक विश्वातील लोकप्रिय कंपनी गुगल आपल्या ग्राहकांसाठी सतत नवे फिचर्स लाँच करत असते. त्यामुळे, वापरकर्त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनचा वापर करत असाल तर, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

गुगल अँड्रॉईड स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या फिचरचा वापर करून युझर्सला आता गुगल प्ले स्टोअरवरून एकाच वेळी २ ॲप डाऊनलोड करता येणार आहेत. याच अपडेटची युझर्स मागील बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. त्यामुळे, तुमची प्रतिक्षा आता संपली आहे. युझर्स आता एकाच वेळी गुगल प्ले स्टोअरवरून २ ॲप डाऊनलोड करण्यास सक्षम असतील. या व्यतिरिक्त युझर्स प्ले स्टोअरवर एकाच वेळी अनेक ॲप्स अपडेट करू शकतील.

9To5Google च्या एका रिपोर्टनुसार, गुगलने या नव्या फिचरची टेस्टिंग पूर्ण केली आहे. शिवाय, हे फिचर रोलआऊट देखील केले आहे. याआधी गुगल प्ले स्टोअरवर ॲप डाऊनलोड करताना एका वेळी एकच ॲप डाऊनलोड करता यायचे आणि ते डाऊनलोड झाल्यावरच दुसरे ॲप डाऊनलोड करता यायचे. परंतु, आता हे नवीन फिचर आल्यामुळे तुमचे काम आपोआपच सोपे होणार आहे. शिवाय, युझर्सचा वेळ ही वाचणार आहे.

Google Play Store
Google Maps : आता गुगल सांगणार कुठे आहे जवळचं ईव्ही चार्जिंग स्टेशन; मॅप्समध्ये येणार नवीन फीचर

गुगलचे हे नवे फिचर कसे काम करणार?

सर्वात आधी तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर सुरू करा. आता त्यामध्ये कोणतेही २ अधिक ॲप्स इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर क्लिक करता तेव्हा २ ॲप्स एकाचवेळी डाऊनलोड व्हायला लागतात. यासोबतच आता तिसरे ॲप पेंडिंगमध्ये तुम्हाला दिसेल. अशाप्रकारे गुगलच्या या नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही अनेक अँड्रॉईड ॲप्स सहज डाउनलोड करू शकाल.

हे फिचर कसे काम करते? हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील तपासू शकता. जर तुम्ही नवीन अँड्रॉईड स्मार्टफोन किंवा टॅबलेट खरेदी कराल, तेव्हाही तुम्हाला हे फिचर उपयुक्त ठरू शकेल. भविष्यात गुगलचे मल्टिडाऊनलोड फिचर युझर्साठी लाँच केले जाईल. अद्याप हे फिचर लाँच करण्यात आलेले नाही.

Google Play Store
Google Layoffs: गुगलने पुन्हा केली कर्मचारी कपात; भारतातील कामावर होणार मोठा परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com