गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स

google_play
google_play

नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले आहेत. अनेक मोबाईल ऍपमध्ये मालवेअर आणि अ‍ॅडवेयर असल्याची माहिती मिळत आहे. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे ऍप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड होते. 

सिमबॅड (Dubbed SimBad) नावाच्या मालवेअरने अ‍ॅड सर्व्हिसिंग प्लॅटफॉर्मच्या फॉर्मेटमध्ये 200 हून अधिक ऍपवर परिणाम झाला आहे. गुगल स्कॅनिंगच्या सिस्टमला मागे टाकून त्यावर मालवेअर परिणाम करू शकतो. हे मालवेअर एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरु राहू शकते.

गुगलकडून प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यानंतरही काही युजर्सच्या फोनमध्ये हे ऍप अजूनही सुरु असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या गेम्सना जवळपास 55 लाख युजर्सनी डाऊनलोड केले आहे. स्नो हेवी एक्सावेटर सिम्युलेटर, होवरबोर्ड रेसिंग आणि रियल ट्रॅक्टर फार्मिंग सिम्युलेटर अशा ऍपचा यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com