चीनमध्ये 'गुगल' पुन्हा सुरु होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

चीनच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी फायद्याची असणारी 'गुगल स्कॉलर' ही 'गुगल'ची सुविधा चीनमध्ये त्यांच्या पुनरागमनासाठी महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 'गुगल'तर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा वापर कोणतीही राजकीय अथवा इतर संवेदनशील माहिती पसरवण्यासाठी होउ नये यासाठीही काळजी घेण्यात येणार आहे.

बीजिंग : 2010 मध्ये चीन सरकार व 'गुगल'मध्ये सेन्सॉरशिप वरुन वाद झाल्यानंतर चीनमध्ये 'गुगल'वर घालण्यात आलेली बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चीनची गुगलच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु आहे.

2010 मध्ये चीन सरकार तर्फे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे 'गुगल'ने तेथुन काढता पाय घेतला होता. गेल्या सात वर्षांपासुन चीनमध्ये 'गुगल'ची सर्च इंजिन सुविधा तसेच ईमेल सारख्या इतर सुविधांवरही चीन ने बंदी घातलेली आहे. चीनमध्ये सध्या VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर केल्याशिवाय ही वेबसाईट वापरता येत नाही.

चीनच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी फायद्याची असणारी 'गुगल स्कॉलर' ही 'गुगल'ची सुविधा चीनमध्ये त्यांच्या पुनरागमनासाठी महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 'गुगल'तर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा वापर कोणतीही राजकीय अथवा इतर संवेदनशील माहिती पसरवण्यासाठी होउ नये यासाठीही काळजी घेण्यात येणार आहे.

चीन जगातील सर्वात मोठे इंटरनेट मार्केट असुन चीन मध्ये इंटरनेटचे जवळपास 72 कोटी वापरकर्ते आहेत. गेल्या सात वर्षात 'गुगल'वर बंदी घालण्यात आल्यानंतर चीनी भाषेतील 'बैदु' तसेच मायक्रोसॉफ्टचे 'बिंग' हे सर्च इंजिन चीनमध्ये लोकप्रिय झाले होते.    

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google in talks with China for comeback