गुगल 9 लाखांहून अधिक ॲप्सवर घालणार बंदी; जाणून घ्या डिटेल्स

google to remove nearly 900k abandoned apps from play store
google to remove nearly 900k abandoned apps from play store sakal

गुगल तब्बल 9 लाखांहून अधिक ॲप्सवर बंदी घालणार आहे, या ॲप्सना Google Play Store वर पुढील अपडेट देण्यास बंदी घातली जाणार आहे. अँड्रॉईड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार 9 लाखांहून अधिक ॲप्सवर बंदी घालण्यात आल्याने Google Play Store वरील एकूण ॲप्स सुमारे एक तृतीयांश इतक्या कमी होतील. गुगल आणि ॲपलने अशा ॲप्सची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या किंवा गेल्या दोन वर्षांत अपडेट न झालेल्या ॲप्स आहेत, अशा सर्व ॲप्स काढून टाकण्यात येणार आहेत.

जर आपण Google बद्दल बोलीयचे झाले तर, Google Play Store वर सुमारे 869,000 बॅन केलेल्या आणि अपडेट न केलेले ॲप्स आहेत. तर दुसरीकडे अॅपलच्या प्लॅटफॉर्मवर 650,000 ॲप्स आहेत. CNET च्या रिपोर्टनुसार हे ॲप गुगल हाईड करून ठेवणार आहे. हे ॲप्स हटवल्यानंतर, हे ॲप्स डेव्हलपर अपडेट करेपर्यंत वापरकर्ते ते डाउनलोड करू शकणार नाहीत.

google to remove nearly 900k abandoned apps from play store
राज्यसभेसाठी संभाजी राजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

नेमकं कारण काय?

Google आणि Apple दोन्ही कंपन्यांच्या वापरकर्त्याची गोपनीयता आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे या बंदी असलेल्या सर्व अॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे. Android आणि iOS मध्ये जुन्या ॲप्समध्ये आवश्यक बगल केले जात नाहीत, म्हणजे फक्त नवीन API किंवा नवीन डेव्हलपमेंट प्रक्रियेनुसार सुरक्षिततेत भर टाकत नाहीत. या कारणास्तव, जुन्या अॅपमध्ये सुरक्षिततेचा अभाव असतो, असे सांगण्यात आले आहे.

google to remove nearly 900k abandoned apps from play store
दुकानदाराकडून दलित मुलीला बेदम मारहाण, कारण ऐकून होईल संताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com