
Google Doodle 2025 for 27th birthday significance
Sakal
गुगलने २७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
या खास दिवशी लोगोमध्ये बदल दिसत आहे.
तसेच खास डूडल देखील तयार केले आहे.
Google 27th birthday celebration 2025 nostalgic doodle: गुगल आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी गुगलने एक खास डूडल लाईव्ह केले आहे. हे डूडल गुगलचा पहिला जूना लोगो आहे. या वर्षीचे डूडल जुन्या आठवणींना ताजेतवाने करणार आहे. हे डूडल यूजर्संना गुगल किती पुढे आले आहे याची आठवण करून देते. होमपेजवर दिलेल्या संदेशात गुगलने लिहिले आहे की, 'आजचे डूडल गुगलचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. इतक्या वर्षांपासून आमच्यासोबत सर्च केल्याबद्दल धन्यवाद!'