Google Chrome Alert : गुगल वापरकर्त्यांसाठी सरकारचा अलर्ट! पटकन बदला 'ही' सेटिंग, नाहीतर हॅक होऊ शकतो मोबाईल अन् लॅपटॉप

Google Chrome Update Cyber Secutiy CERT-In Alert : गूगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सरकारने हाय रिस्क सायबर सुरक्षा इशारा दिला आहे. जुनं व्हर्जन वापरत असल्यास तातडीने अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Google Chrome Update Cyber Secutiy CERT-In Alert
Google Chrome Update Cyber Secutiy CERT-In Alertesakal
Updated on

Cyber Secutiy Tips : जर तुम्ही Google Chrome ब्राउझरचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहे. भारत सरकारच्या Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने Chrome च्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी हाय रिस्क सायबर सुरक्षा इशारा जारी केला आहे.

या इशाऱ्यानुसार, Chrome च्या जुन्या व्हर्जनमध्ये एक गंभीर सुरक्षा त्रुटी आढळली आहे. ज्यामुळे सायबर हॅकर्सना तुमच्या संगणकावर अनधिकृत प्रवेश मिळू शकतो आणि हॅकिंग होऊ शकते

कोणत्या वापरकर्त्यांसाठी धोका आहे?

CERT-In च्या सल्ल्यानुसार, Google Chrome च्या जुन्या डेस्कटॉप व्हर्जन्समध्ये हा त्रुटीचा धोका आहे. जर तुमचा Chrome व्हर्जन 136.0.7103.113 किंवा यापेक्षा जुना असेल, तर तुम्ही सायबर हल्ल्याच्या जोखमीच्या क्षेत्रात आहात.

Google ने ही त्रुटी नवीन व्हर्जनमध्ये सुधारली असून Chrome 136.0.7103.113 आणि त्याहून नवीन व्हर्जन वापरणाऱ्यांना कोणताही धोका नाही.

Google Chrome Update Cyber Secutiy CERT-In Alert
Chandrayaan 5 Explainer : चंद्रावर भारताची पुन्हा एकदा झेप, ISRO अन् जपानची 'चंद्रयान-5' मोहीम आहे तरी काय? वाचा सविस्तर

Chrome अपडेट कसे करावे?

तुमच्या Chrome ब्राउझरला सुरक्षित ठेवण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करा

  1. Chrome उघडा.

  2. वर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स क्लिक करा.

  3. Settings निवडा.

  4. खाली स्क्रोल करून “About Chrome” वर क्लिक करा.

  5. येथे Chrome आपोआप अपडेट होईल आणि नवीन व्हर्जन डाऊनलोड होईल.

  6. अपडेटनंतर ब्राउझर रिलॉन्च (पुन्हा सुरू) करा.

  7. यानंतर तुम्ही व्हर्जन तपासू शकता. ते 136.0.7103.114 असल्याची खात्री करा.

Google Chrome Update Cyber Secutiy CERT-In Alert
AC Explosion Safety Tips : एसी वापरताना एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट; आत्ताच पाहा कशी खबरदारी घ्यावी?

दरम्यान, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एयरटेलने 38 कोटी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी Fraud Detection Solution सुरू केले आहे. या प्रणालीमुळे फसवणूक कॉल्स, फिशिंग लिंक्स आणि इतर ऑनलाइन स्कॅम्स ओळखले जातील आणि ग्राहक सुरक्षित राहतील.

Google Chrome वापरकर्त्यांसाठी हा एक गंभीर सुरक्षा इशारा आहे. तुमचे ब्राउझर जर जुन्या व्हर्जनचे असेल, तर लगेच अपडेट करा. नाहीतर तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. इंटरनेट सुरक्षिततेसाठी सावध राहा आणि वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com