

elon musk grok ai uers personal details leak
esakal
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ग्रोक पुन्हा एकदा प्रचंड वादात सापडला आहे. यावेळी ग्रोकने थेट लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. फक्त नाव टाकले की, ग्रोक सेलिब्रिटी असो की सामान्य नागरिक, त्याचा अचूक घराचा पत्ता, फोन नंबर, ईमेल आणि कुटुंबीयांची माहितीही एका क्लिकवर जगासमोर आणून ठेवत आहे