सूर्याभोवती पडले खळे (व्हिडिओ)

राजेंद्र घोरपडे
गुरुवार, 2 मे 2019

कोल्हापूर - येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सूर्याभोवती खळे तयार झालेले पाहायला मिळाले. याबाबत अनेक तर्क-वितर्क काल सोशल मिडियावर चर्चिले जात होते. तज्ज्ञाचे मते हा आॅप्टिकल प्रिझमचा हा प्रकार आहे. 

कोल्हापूर - येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सूर्याभोवती खळे तयार झालेले पाहायला मिळाले. याबाबत अनेक तर्क-वितर्क काल सोशल मिडियावर चर्चिले जात होते. तज्ज्ञाचे मते हा आॅप्टिकल प्रिझमचा हा प्रकार आहे. 

याबाबत माहिती देताना खगोलशास्त्र अभ्यासक डाॅ. प्रा. मिलिंद मनोहर कारंजकर म्हणाले, सूर्या भोवतालचा खळे किंवा रिंगण हा प्रिझममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसा हा प्रकार आहे. सूर्याभोवतीच्या खळ्यास इंग्रजीमध्ये हेलो (Halo) असेही म्हणतात. हेलो यास मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असेही म्हटले जाते. वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळजवळ 20 हजार फुटावर सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगामध्ये लाखोंच्या संख्येने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन किंवा स्पिल्टिंग होते. यातूनच सूर्याच्या भोवती रिंगण किंवा खळे पाहायला मिळते. यामध्ये बर्फाचे तुकडे हे प्रिझमप्रमाणे काम करतात. पाण्याचा रिफरॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 असतो. पाणी हे द्रव स्वरूपात असते पण बर्फ झाल्यानंतर त्याचे रुपांतर घन पदार्थामध्ये होते. हवेतून सर्याचे किरण जेव्हा घन पदार्थातून जातात. तेव्हा माध्यम बदलते. एक रिफरॅक्टिव्ह इंडेक्समधून 1.33 मध्ये गेल्यानंतर या किरणांचे वक्रिकरण होते. यातून हे खळे दिसते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लालरंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवतीही हे खळे दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Halo seen in Sky around sun in kolhapur