Hanooman AI भारतात लाँच; 98 भाषांमध्ये काम करणार अ‍ॅप, असं करा डाऊनलोड

Hanooman AI: या १२ भारतीय भाषांमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, उडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे.
Hanooman AI
Hanooman AIEsakal

भारताचे स्वदेशी, बहुभाषिक आणि परवडणारे GenAI प्लॅटफॉर्म हनुमान 12 भारतीय भाषांसह जगातील 98 भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. ते शुक्रवारी लाँच करण्यात आले.

या १२ भारतीय भाषांमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, उडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे.

यासह Hanooman App इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, जर्मन, जपानी, कोरियन यासह जगभरातील इतर 80 भाषांमध्ये उपलब्ध असेल.

हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जनरेटिव्ह AI व्यवसाय SML India ने अबू धाबी कंपनी 3AI होल्डिंगच्या भागीदारीत विकसित केले आहे. ते भारतात वेब आणि मोबाईल ॲपद्वारे वापरले जाऊ शकते.

अ‍ॅप असं डाऊनलोड करा

अँड्रॉईड युजर्स हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. हनुमान लवकरच iOS ॲप स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यांची प्रीमियम सबस्क्रिप्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाणार आहे.

SML इंडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ विष्णु वर्धन म्हणाले, हनुमान भारतातील एआय इनोव्हेशनच्या नवीन युगाचे प्रतीक आहे. केवळ एका वर्षात २० कोटी युजर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. 80 टक्के भारतीयांना इंग्रजी येत नसल्याने हनुमानाचा वापर भारतीय भाषांमध्येही करता येणार आहे.

Hanooman AI
Audi India : मूडनुसार बदलणार केबिनचा रंग.. ऑडीच्या 'या' गाडीत मिळणार अनेक स्पोर्टी फीचर्स

3AI होल्डिंगचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, हनुमान ॲप हे भारतातील प्रत्येक व्यक्तीला वापरता यावे यसाठी आहे. हनुमान भारतात आणि भारतीयांसाठी बनले आहेत.

ते पुढे म्हणाले, हनुमान ॲपचा डेटाही भारतातच साठवला जाणार आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, GenAI सह लोकांना सक्षम करून, आम्ही नाविन्यपूर्ण संधींचा उपयोग करू शकतो. यातून आपण देशाच्या विकासात हातभार लावू शकू.

Hanooman AI
Mothers Day 2024 : आईच्या स्मार्टफोनमध्ये हे Apps आहेत का आत्ताच तपासा, तिला जास्त मदत होईल

हनुमानच्या लाँच दरम्यान, SML India ने HP, NASSCOM आणि Yotta सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि नवोन्मेषकांसोबत भागीदारीची घोषणा केली.

NASSCOM सोबत SML India च्या भागीदारीचे उद्दिष्ट AI स्टार्टअप्सना सहकार्य करणे, फिनटेक इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे, 3,000 कॉलेजेससोबत टाय अप करणे आणि संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com