घरबसल्या दुरुस्त करा आधार कार्डमध्ये नाव व पत्ता! 'या' सोप्या स्टेप्सचा करा फॉलो | Technology | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adhar Card
घरबसल्या दुरुस्त करा आधार कार्डमध्ये नाव व पत्ता! 'या' सोप्या स्टेप्सचा करा फॉलो

घरबसल्या दुरुस्त करा 'आधार'मध्ये नाव व पत्ता! 'या' स्टेप्स करा फॉलो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आधार कार्ड (Aadhaar Card) आज प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. त्यामुळेच आधार कार्डामध्ये तुमची सर्व माहिती अचूक असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आधार कार्डात अतिशय महत्त्वाचे तपशील म्हणजे तुमचे नाव आणि पत्ता. आधारमध्ये तुमचे नाव व पत्ता चुकीचे असल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आधारमध्ये तुमच्या नावात व पत्त्यात चूक झाली असल्यास आता तुम्ही ते घरी बसून दुरुस्त करू शकता. UIDAI ने चुकीची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. घरबसल्या तुम्ही तुमच्या आधारमध्ये खाली दिलेल्या सोप्या टिप्सप्रमाणे तुमचे नाव आणि पत्ता दुरुस्त करू शकता.

हेही वाचा: आहारात घ्या 'हे' तीन मसाले अन्‌ कर्करोगाचा धोका टाळून व्हा दीर्षायुषी

आधारमध्ये नाव बदलण्याची प्रक्रिया

 • यासाठी प्रथम uidai.gov.in ही वेबसाइट उघडा

 • मेन पेजवर तुम्हाला प्रथम MY आधार पर्याय दिसेल. तिथे क्‍लिक करा.

 • आता Update Your Aadhaar विभागात जा, येथे तुम्हाला Update your Demographics Data Online चा पर्याय दिसेल, त्यावर क्‍लिक करा.

 • त्यावर क्‍लिक करून, तुम्ही UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट, ssup.uidai.gov.in वर पोचाल.

 • आता तुम्हाला तुमच्या 12 अंकी आधार क्रमांकाने लॉग इन करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा भरा आणि send OTP वर क्‍लिक करा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

 • OTP प्रविष्ट केल्यानंतर, पुढील स्टेप्समध्ये एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता, जन्मतारीख, नाव आणि लिंग आणि इतर अनेक माहिती जसे की तुमचे वैयक्तिक तपशील भरावे लागतील.

 • आता तुम्हाला तो विभाग निवडावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत. म्हणजेच आता तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता बदलण्याचे पर्याय उपलब्ध असतील. जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर Update Name वर क्‍लिक करा.

 • नाव अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे आयडी प्रूफ असणे आवश्‍यक आहे. आयडी प्रूफ म्हणून तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड अपलोड करू शकता.

 • सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी एक OTP पाठवला जाईल आणि तुम्हाला ते व्हेरिफाय करावे लागेल. त्यानंतर Save Changes करा.

हेही वाचा: 'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा...

आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रिया...

 • आधारमध्ये पत्ता बदलण्यासाठी, resident.uidai.gov.in ला भेट द्या आणि आधार अपडेट विभागात दिलेल्या ''Request Aadhaar Validation Letter' वर क्‍लिक करा.

 • यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) उघडेल.

 • तुमचा 12 अंकी आधार क्रमांक वापरून लॉगइन करा.

 • एसएमएसद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लिंक मिळेल.

 • OTP आणि captcha टाकून व्हेरिफाय करा.

 • आता SRN द्वारे लॉगइन करा. सबमिशन केल्यानंतर तुम्हाला एक पत्र मिळेल.

 • यानंतर तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जाऊन 'Proceed to Update Address' वर क्‍लिक करावे लागेल. आणि Secret Code च्या माध्यमातून Update Address चा पर्याय निवडावा लागेल.

 • 'सिक्रेट कोड' टाकल्यानंतर नवीन पत्ता तपासा आणि सबमिटवर क्‍लिक करा. आता स्क्रीनवर दिसणारा 'अपडेट रिक्वेस्ट नंबर' (URN) नोंद करून ठेवा.

loading image
go to top