६० हजारांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या तीन बाइक्स; देतात दमदार मायलेज

hero hf deluxe to tvs sport Bajaj Platina 100 top motorcycle under 60000 rupees in india check details
hero hf deluxe to tvs sport Bajaj Platina 100 top motorcycle under 60000 rupees in india check details

भारतीय बाजारपेठेतील स्वस्त मोटरसायकलची मागणी कधीच कमी होत नाही. इलेक्ट्रिक टू व्हीलरची संख्या वाढत असूनही, लोक अजूनही कम्युटर बाईक्स खरेदी करत आहेत. Hero पासून Bajaj आणि TVS पर्यंत परवडणाऱ्या रेंजमध्ये अनेक बाइक विकतात. आज आपण अशा 3 दमदार बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या बाजारात 60,000 रुपयांपेक्षा कमीत मिळतात.

1. Hero HF Deluxe

Hero HF Deluxe ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे. त्याची किंमत 54,650 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. या बाइकमध्ये 97.2 cc इंजिन आहे जे 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने त्याचे डिझाइन अगदी सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याला पुढील आणि मागील बाजूस 130mm ड्रम ब्रेक मिळतात. HF Deluxe बाईकचे वजन 112 kg आहे आणि तिची इंधन टाकीची क्षमता 9.6 लीटर आहे ही बाईक 65 किमी/ली पर्यंत मायलेज देते.

hero hf deluxe to tvs sport Bajaj Platina 100 top motorcycle under 60000 rupees in india check details
लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी

2. Bajaj Platina 100

बजाज प्लॅटिना 100 ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 100 सीसी बाईकपैकी एक आहे. त्याची किंमत 54,650 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. तर ही बाईक सेल्फ-स्टार्ट फीचर, लांब सीट आणि बेस्ट इन क्लास मायलेजसह येते. बाईकमध्ये 7.79 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क जनरेट करणारे इंजिन आहे. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्ससोबत, बजाज प्लॅटिना 100 कंबाईन ब्रेकिंग सिस्टमसह येते. बाईकचे वजन 119 किलोग्रॅम आहे आणि 11 लीटरची इंधन टाकी मिळते. ही बाईक 75 किमी/ली पर्यंत मायलेज देते.

hero hf deluxe to tvs sport Bajaj Platina 100 top motorcycle under 60000 rupees in india check details
घरातच स्टेडियमचा फील; IPL पाहण्यासाठी 'हे' प्रोजेक्टर्स आहेत बेस्ट

3. TVS Sport

ही देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाइकपैकी एक आहे. या बाईकची किंमत 59,130 ​​रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. हे 2 व्हेरिएंट आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. TVS Sports मध्ये 109.7cc इंजिन आहे जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. TVS स्पोर्टला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस ड्रम ब्रेक मिळतात. या स्पोर्ट बाईकचे वजन 112 किलो आहे आणि त्यात 10 लीटरची इंधन टाकी आहे. हे 75 किमी/ली पर्यंत मायलेज देते.

hero hf deluxe to tvs sport Bajaj Platina 100 top motorcycle under 60000 rupees in india check details
युध्दाच्या विरोधात पुतिन यांच्या सल्लागाराचा राजीनामा; सोडला देश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com