
Hero Splendeor Plus: भारतामध्ये सगळ्यात जास्त विक्री होणारी मोटारसायक म्हणजे स्प्लेंडर प्लस, आता ही दुचाकी स्वस्त झाली आहे. त्याचं कारण बदललेला जीएसटी स्लॅब. GST 2.0 लागू झाल्यानंतर बाईकच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सामान्यांना या गाड्या स्वस्तात खरेदी करता येतील. जर तुम्ही सणांच्या काळात नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.