esakal | Hero Motocorpची हटके एक्सप्लस 200 4व्ही भारतीय बाजारात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Hero Motocorp Xpulse 200 4v
Hero Motocorpची हटके एक्सप्लस 200 4व्ही भारतीय बाजारात दाखल

Hero Motocorpची हटके एक्सप्लस 200 4व्ही भारतीय बाजारात दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हिरो मोटोकाॅर्पने (Hero Motocorp) गुरुवारी (ता.आठ) भारतात पाॅवरफुल हिरो एक्स पल्स २०० ४ व्ही मोटारसायकल (Xpulse 200 4V) सादर केली आहे. ही मोटारसायकल १ लाख २८ हजार १५० रुपये (दिल्लीत एक्स शोरुम) आहे. याचे एक स्पेशल रॅली किट व्हर्जनही येते. या मोटारसायकलचे कंपोनेंट्स (साहित्य) सध्या ४६ हजार रुपये जास्तीचे देऊन मिळतायत. हिरो एक्स प्लस २०० ४ व्ही एक्स पल्स रेंज मोटारसायकलींमध्ये चार व्हाॅल्वचे एडिशन आहे. ती नुकतीच भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना दिसली होती. त्यात नवीन फोर व्हाॅल्व इंजिन, जास्त पाॅवर आणि अधिक टाॅर्क मिळेल. नवीन एक्स पल्स २०० ४ व्ही तीन नवीन रंगात उपलब्ध आहे. ट्रेल ब्लू, ब्लिट्झ ब्लू आणि रेड रेड ही ती रंग. ती १९९.६ सीसी, सिंगल सिलेंडर, ऑईस कुल्ड इंजिन द्वारा चालते. ते स्टँडर्ड एक्स पल्स २०० ला ही पाॅवर देते. एक्स पल्स बीएस-व्हीआय इंजिनने सज्ज आहे. जे ८५०० आरपीएम वर १९.१ पीएस @ चे पाॅवर आऊटपुट आणि १७.३५ एनएम @ ६५०० आरपीएम टाॅर्क निर्माण करते. हे इंजिन पाच स्पीड गिअरबाॅक्ससह एलईडी हेडलाईटबरोबर येते.

हेही वाचा: होंडा अॅक्टिव्हा खरेदी करा २५ हजारात, आवडली नाही तर परत करा

या व्यतिरिक्त, ड्युअल पर्पज टायर, १०-स्टेप अॅडजस्टेबल मोनो शाॅक सस्पेंशन, ८२५ मीमीची सीट हाईट आणि २२० मीमीची ग्राऊंड क्लिअरन्स ऑन/ ऑफ रोड रोमांचसाठी एक प्लस पाॅईन्ट मानले जाऊ शकते. असे म्हटले जाऊ शकते की ही मोटारसायकल सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी बनवली आहे. माती, खड्डे, दुर्गम किंवा कच्चे रस्ते आणि नाले आदींना ती पार करु शकते. दुसरीकडे मोटारसायकलचा लूकही मड रेसिंगशी काही प्रमाणात मिळते-जुळते. यामुळे मोटारसायकल शौकिनांना ती खूप आवडेल. बाजारात अशाच प्रकारची मोटारसायकल राॅयल एन्फिल्डने आणली होती. तिचे नाव हिमालयन. तिला लांब पल्ल्याबरोबर डोंगराळ भागात चालवण्यास पसंती दिली जायची. मात्र शहरांमध्ये युवा वर्गाने ती वेगळ्या अंदाजासाठी निवडली होती.

loading image
go to top