Hero Bike: हीरोने भारतात लाँच केली भन्नाट बाईक, पॉवरफुल इंजिनसह मिळेल बरचं काही; पाहा किंमत

देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी Hero Motocorp ने आपल्या नवीन XPulse 200T 4V ला लाँच केले आहे. बाईकची एक्स-शोरुम किंमत १,२५,७२६ रुपये आहे.
Hero XPulse 200T 4V
Hero XPulse 200T 4VSakal

Hero XPulse 200T 4V Launched: देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी Hero Motocorp ने आपल्या नवीन XPulse 200T 4V ला लाँच केले आहे. या नवीन बाईकमध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. Hero XPulse 200T 4V ची एक्स-शोरुम किंमत १,२५,७२६ रुपये आहे.

नवीन Hero Xpulse 200T 4V मध्ये कंपनीने २००सीसीचे ४-वॉल्व ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. इंजिन ८५००rpm वर १९.१ PS पॉवर आणि ६५००rpm वर १७.३ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गियरबॉक्ससह येते. हेच इंजिन कंपनीने Xpulse 200 एडव्हेंचरमध्ये दिले आहे. जुन्या इंजिनच्या तुलनेत नवीन ४व्ही इंजिन ६ टक्के जास्त पॉवर जनरेट करते.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

अपडेटेड डिझाइनबद्दल सांगायचे तर Xpulse 200T 4V मध्ये कंपनीने निओ रेट्रो स्टाइलिंगसह बोल्ड ग्राफिक्स आणि हटके कलर दिले आहेत. याशिवाय, फुल एलईडी हेडलॅम्प्ससह क्रोम रिंग आणि LED पॉजिशन लॅम्प्स देण्यात आले आहेत. याशिवाय, लांबचा प्रवास करताना आरामदायी अनुभव मिळावा यासाठी शानदार सीट मिळतात. कलर्ड, वाइडर, फ्रंट फॉर्क स्लिव्हस आणि कलर्ड सिलेंडर हेड देखील मिळेल.

Hero XPulse 200T 4V
National Mathematic Day: अवघड गणित क्षणार्धात सोडवणाऱ्या शकुंतला देवी; 'ह्यूमन कॉम्प्युटर' म्हणून होत्या परिचित

टेक्नोलॉजीबद्दल सांगायचे तर XPulse 200T 4V मध्ये फुल डिजिटल एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी कॉल अलर्ट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अंडर सीट USB चार्जर, गिअर इंडिकेटर आणिसाइड-स्टँड इंजिन कट ऑफ दिले आहे. बाईक ३७mm फ्रंट फॉर्क्स आणि ७-स्टेप एडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन, १३० एमएम रुंद रेडिएल रियर टायर ग्रीफसह येते. फ्रंट टायरमध्ये २७६एमएम डिस्क आणि रियरला २२०एमएम रियर डिस्क मिळेल.

हेही वाचा: Corona Virus: कोरोना पुन्हा येतोय! आताच घरी आणा हे मेडिकल गॅजेट्स, ऐनवेळी होईल खूपच उपयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com