Gold Earth Core : सोनं स्वस्त होणार? पृथ्वीच्या गाभ्यात दडलेला 'सोन्याचा खजिना' येतोय जमिनीवर; संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

Gold in Earth Core Research : पृथ्वीच्या गाभ्यात दडलेला सोन्याचा खजिना हळूहळू पृष्ठभागावर झिरपत असल्याचं वैज्ञानिक संशोधनात उघड झालं आहे.
Gold in Earth Core Research
Gold in Earth Core Researchesakal
Updated on

Gold in Earth Core : पृथ्वीच्या गर्भात हजारो किलोमीटर खोल लपलेला सोन्याचा महाखजिना आता हळूहळू पृष्ठभागावर झिरपत असल्याची धक्कादायक माहिती वैज्ञानिकांनी उघड केली आहे. यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत गतिशीलतेबाबत नवे दृष्टीकोन समोर आले आहेत.

जर्मनीतील गोटिंजेन विद्यापीठाच्या भू-रसायनशास्त्र विभागातील संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनात हे उघड झाले आहे की, पृथ्वीच्या गाभ्यात असलेले सोनं व इतर मौल्यवान धातू पृथ्वीच्या खालच्या भागातून म्हणजे मँटलमधून वर येत आहेत.

गाभ्यात दडलेला अब्जावधी टन मौल्यवान धातूंचा साठा

संशोधकांनी स्पष्ट केलं की पृथ्वीच्या एकूण मौल्यवान धातूंपैकी तब्बल ९९.९९९% धातू गाभ्याच्या ३००० किमी खोल अंतरात बंदिस्त आहेत. पृथ्वीचा गाभा म्हणजेच सोनं, रुथेनियम (Ru) आणि अन्य मौल्यवान धातूंचा सर्वात मोठा साठा आहे.

संशोधकांनी हवाई बेटांवरील ज्वालामुखीच्या खडकांत 'रुथेनियम-१००' पाहिले. हे पृथ्वीच्या निर्मितीच्या काळातच गाभ्यात बंदिस्त झालं होतं, असं मानलं जातं. त्यामुळे गाभ्यातून हा पदार्थ वरच्या थरांत कसा पोहोचला, हा एक नवा प्रश्न निर्माण झाला.

Gold in Earth Core Research
OTT प्रेमींसाठी खुशखबर! एकाच रिचार्जमध्ये Netflix, JioCinema अन् Zee5; 'या' बड्या कंपनीने आणला धमाकेदार प्लॅन, किंमत फक्त..

डॉ. निल्स मेस्लिंग यांनी सांगितले की, "प्रारंभिक निष्कर्ष समोर येताच आम्हाला जाणवलं की आपण प्रत्यक्षात 'सोनं सापडलं' आहे! आमच्या डेटाने हे सिद्ध केलं की गाभ्यातील धातू मँटलमधून वर झिरपत आहेत."

या संशोधनामुळे असा नवा निष्कर्ष समोर आला की पृथ्वीचा गाभा पूर्णतः वेगळा नाही, तर तो मँटलसह परस्परसंवाद साधतो. प्रा. मथियास विल्बोल्ड यांच्या मते, “गाभा आणि मँटल यांच्या सीमेवरून अब्जावधी टन गरम खडक वर येतात आणि त्यातून हवाईसारखी महासागरी बेटं तयार होतात."

Gold in Earth Core Research
Yezdi Adventure 2025 : बाईक प्रेमींनो तयार व्हा! लॉन्च होतीये 'Yezdi Adventure 2025', आकर्षक डिझाइन अन् नवे फीचर्स, किंमत फक्त..

आज आपल्याला सोनं, प्लॅटिनम, रुथेनियम यांसारख्या धातूंची गरज औद्योगिक, वैद्यकीय आणि हरित ऊर्जा क्षेत्रात भासते. या धातूंचा एक महत्त्वाचा स्रोत गाभ्यापासून वर झिरपणाऱ्या खडकांत मिळू शकतो, ही शक्यता या संशोधनाने अधोरेखित केली आहे.

डॉ. मेस्लिंग म्हणाले , “ही शोधफेरे पृथ्वीच्या आतल्या संरचनेबाबत आपली समज बदलून टाकणारी आहे. या संशोधनामुळे पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली आणि मौल्यवान खनिज स्रोतांबाबत नवे दृष्टिकोन समोर आले आहेत.."

Gold in Earth Core Research
AI Jobs : युवकांनो सावध व्हा! 5 वर्षात AIमुळे नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार; आत्ताच शिकून घ्या 'ही' कौशल्ये, गुगल सीईओने केले सतर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com