Honda Toyota Price Hike : होंडाने वाढवले सेफ्टी फीचर्स, मात्र गाड्यांच्या किंमतीही वाढल्या; टोयोटाचाही मोठा निर्णय

Honda Cars India : होंडा कार्स इंडियाने सिटी, सिटी हायब्रिड, अमेझ आणि एलिव्हेट यांसह आपल्या सर्व गाड्यांमध्ये नवीन सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
Honda Toyota Price Hike
Honda Toyota Price Hike eSakal

Honda Cars Price Hike : भारतातील होंडा आणि टोयोटा या दोन कार कंपन्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. एक एप्रिलपासून या किंमती लागू होणार असल्याचं टोयोटाने सांगितलं आहे.

होंडाचे सेफ्टी फीचर्स वाढणार

होंडा कार्स इंडियाने सिटी, सिटी हायब्रिड, अमेझ आणि एलिव्हेट यांसह आपल्या सर्व गाड्यांमध्ये नवीन सेफ्टी फीचर्स दिले आहेत. होंडा एलिव्हेट आणि सिटी सेडान कारमध्ये आता 6 एअरबॅग आणि सर्व सीट्सना एअरबॅग देण्यात येतील. तसंच यामध्ये 3-पॉइंट इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅकर सीट बेस्ट हे स्टँडर्ड येतील.

कोणते फीचर्स मिळणार?

होंडा एलिव्हेटमध्ये सर्व पॅसेंजर्सना एडजस्टेबल हेड-रेस्ट, ड्रायव्हर-को ड्रायव्हरला व्हॅनिटी मिरर, डिजी एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-स्पीकर साउंड सिस्टीम आणि रिअर सनशेड असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे एलिव्हेट गाडीच्या किंमती सुमारे 22,000 रुपयांनी वाढल्या आहेत.

दुसरीकडे, होंडा सिटीमध्ये मिळणाऱ्या नवीन फीचर्सनंतर आता सिटी सेडानच्या बेस व्हेरियंटची किंमतही सुमारे 20 हजार रुपयांनी वाढली आहे. होंडाच्या इतर गाड्याही काही प्रमाणात महागल्या आहेत. (Honda Car Price Hike)

Honda Toyota Price Hike
Toyota Battery : 10 मिनिटात फुल चार्ज अन् 1,200 किलोमीटर रेंज! इलेक्ट्रिक गाड्या धावणार सुसाट; टोयोटा बनवतंय खास बॅटरी

टोयोटाचाही मोठा निर्णय

टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सने (TKM) नवीन आर्थिक वर्षात आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून या किंमती लागू झाल्या आहेत. भारतात टोयोटा-किर्लोस्करच्या 11 गाड्या उपलब्ध आहेत. (Toyota Cars Price Hike)

ग्लांझा, रुमियन, हायक्रॉस, वेल्फायर, फॉर्च्युनर, लीजेंडर, अर्बन क्रूझर, हायरायडर, लँड क्रूझर, हिलक्स आणि इनोव्हा क्रिस्टा अशा सर्व गाड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

टोयोटाने इनपुट आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर सर्व गाड्यांच्या किंमती 1 टक्क्याने वाढल्या आहेत.

Honda Toyota Price Hike
Xiaomi SU7 : टेस्लाचं दुकान होणार बंद? श्याओमीने स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com